Heat Wave-Weather Department | गेल्या 122 वर्षांत यंदाचा एप्रिल सर्वाधिक उष्ण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Heat Wave-Weather Department | भारतीय हवामान विभागाचा Indian Meteorological Department (IMD) मासिक हवामान सारांश (Monthly Weather Summary) नुकताच प्रसिद्ध झाला आहे. त्यामध्ये देशात गेल्या 122 वर्षांत यंदाचा एप्रिल महिना सगळ्यात उष्ण (Hot) ठरला आहे. विशेष म्हणजे 122 वर्षांत मार्च महिनाही सगळ्यात उष्ण राहिला आहे. (Heat Wave-Weather Department )

 

देशात एप्रिल महिन्यात साधारण मासिक कमाल सरासरी तापमान 35.3 अंश सेल्सियस नोंदले गेले तर किमान तापमान 33.94 अंश सेल्सियस होते. 1901 पासून ते आजपर्यंत दोन उष्ण एप्रिल महिने हे गेल्या दशकातील आहेत. 2010 मध्ये एप्रिल महिन्यात मासिक सरासरी कमाल तापमान 35.42 अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले होते. तर 2016 मध्ये ते 35.32 अंश सेल्सियस नोंदवले. यंदा एप्रिलमधील अनेक रात्र या नेहमीपेक्षा जास्त उष्ण ठरल्या असे या मासिक सारांशात म्हंटले आहे. (Heat Wave-Weather Department)

 

यंदा एप्रिलमध्ये मासिक सरासरी कमाल तापमान (Temperature) 23.51 अंश सेल्सियस एवढे नोंदले गेले. हे तापमान सामान्य कमाल तापमानापेक्षा 1.36 अंश सेल्सियसने कमी होते. विशेष म्हणजे 1901 नंतर दुसऱ्यांदा अशी परिस्थिती आली आहे. देशातील अनेक महत्त्वाच्या भागात एप्रिलमधील दीर्घकाळ राहिलेली उष्णतेच्या लाटांचा परिणाम झाला आहे.

 

दरम्यान, देशात असणाऱ्या काही हवामान स्थानकांनी एप्रिलमध्ये त्यांच्या नेहमीच्या तापमानाला यंदा मागे टाकले आहे.
यामध्ये हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh), ओडिशा (Odisha), झारखंड (Jharkhand), उत्तर प्रदेश (Uttar Pradesh),
राजस्थान (Rajasthan), मध्यप्रदेश (Madhya Pradesh), पंजाब (Punjab), कर्नाटक (Karnataka) आणि लक्ष्यद्वीप बेटे (Lakshadweep Islands) या हवामान स्थानकांचा समावेश होतो.

 

Web Title :- Heat Wave-Weather Department | april is the hottest month in 122 years in the country heat wave weather department IMD

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा