‘या’ गाण्यानं तोडलं दिग्गज खेसारी आणि पवन सिंहच्या गाण्यांचं ‘रेकॉर्ड’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भोजपुरी सिनेमांसोबतच भोजपुरी गाणीही लोकांना आवडतात. भोजपुरी गाणी युट्युबवर तर मोठ्या प्रमाणात सर्च केले जातातच सोबतच भोजपुरी म्युझिक इंडस्ट्रीत टॉपवर राहण्यासाठी सिंगर्समध्ये तगडी स्पर्धाही होताना दिसते. पवन सिंह आणि खेसारी लाल भोजपुरीमधील दिग्गज गायकांपैकी एक आहेत. पंरतु नुकत्याच समोर आलेल्या एका गाण्यानं मात्र या दोघांचंही रेकॉर्ड तोडलं आहे.

‘हॅलो कौन’  असं या गाण्याचं नाव असून रितेश पांडेनं हे गाणं गायलं आहे. गेल्या वर्षी 9 डिसेंबर रोजी हे गाणं रिलीज झालं होतं. रिद्धी म्युझिक वर्ल्ड नावाच्या युट्युब चॅनलवरून हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 24 कोटींहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. हे गाणं युट्युबवर तर अनेकदा ऐकलं आणि पाहिलं गेलं आहेच परंतु टिकटॉक आणि हॅलो यांसारख्या अ‍ॅप्सवरही हजारो लोकांनी या गाण्यावर अनेक व्हिडीओ बनवले आहेत.

खेसारी लाल यादवचं गाणं ‘मिलते मरद हमके भूल गइलू है’ या गाण्याला 32 कोटी व्ह्युज घेण्यासाठी तब्बल 3 वर्षे लागली होती. पवन सिंहच्या गाण्यांबद्दल बोलायचं झालं तर हे त्याचं गाणं 2016 साली युट्युबवर अपलोड करण्यात आलं होतं. या गाण्यानं आतापर्यंत 30 कोटी व्ह्युज घेतले आहेत. रितेश पांडेबद्दल बोलायचं झालं तर स्नेहा उपाध्याय आणि त्यानं मिळून हे गाणं गायलं आहे.

कोणी लिहिलं गाणं ?
हे गाणं आशिष वर्मानं लिहिलं आहे. आशिष वर्मानंच या गाण्याचं म्युझिक डायरेक्शन केलं आहे. खास बात अशी की, या गाण्यात भोजपुरीचा जास्त वापर करण्यात आलेला नाही. टिकटॉकवर तर अनेक लोकांनी यावर व्हिडीओज बनवले आहेत. हे व्हिडीओज तुफान व्हायरल झाले आहेत.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !