हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीचा घंटानाद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – हेल्मेट सक्ती विरोधी कृती समिती चे कार्यकर्ते आणि आमदार मेधा कुलकर्णी यांच्यात घंटानाद आंदोलनाच्यावेळी खडाजंगी झाली. अखेर हेल्मेट सक्ती ला विरोध करीत कुलकर्णी यांनी आंदोलन स्थळावरून काढता पाय घेतला.

हेल्मेट सक्तीच्या विरोधात पुणेकर नागरिक कृती समितीने मंडई येथील टिळक पुतळ्याजवळ घंटानाद आंदोलन सुरू केले. शुक्रवारी सकाळी हे आंदोलन सुरू झाल्यानंतर आमदार कुलकर्णी तेथे आल्या. त्यांनी हेल्मेट सक्तीच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा दिला. समितीचे कार्यकर्ते हे घोषणाबाजी करित असताना काही कार्यकर्त्यांनी पालकमंत्री आणि सत्ताधारी भाजपच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. हा प्रकार सहन न झाल्याने आमदार कुलकर्णी यांनी माईकचा ताबा घेतला. कुलकर्णी यांनी कार्यकर्त्यांना भाजप आणि पालक मंत्री यांच्याविरोधात घोषणा देऊ नका असे सांगितले. यामुळे काही कार्यकर्ते संतप्त झाले त्यांनी ‘नही चलेगी नही चलेगी दादागिरी नही चलेगी’ अशा घोषणा दिल्या. यावेळी उपस्थित काही कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. हे आंदोलन सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांचे आहे कोणत्याही एका पक्षाविरोधात नसून जे सत्तेवर आहे. त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली जात आहे. कोणा एका व्यक्तीच्या विरोधात ही घोषणाबाजी नाही किंवा त्या व्यक्तीचा निषेध केला जात नाही अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली.

अखेर वातावरण निवळण्याचा प्रयत्न करणारे कार्यकर्ते आणि आमदार कुलकर्णी यांनी आंदोलन स्थळावरून काढता पाय घेतला. याबाबत पत्रकारांशी बोलताना कुलकर्णी म्हणाल्या “हेल्मेट सक्तीच्या विरोधात मी आमचे आमदार समिती सोबत आहोत पुढील काळात कायदेशीर लढाई कृती समितीने लड्डी तर त्या प्रक्रियेला आमचा पाठिंबा राहील हेल्मेट सक्ती शिथिल केले जाईल असे आश्वासन मी देते हेल्मेट सक्ती मध्ये शासन किंवा किंवा पक्षाचा संबंध नाही “.

याबाबत माजी नगरसेविका रूपाली पाटील म्हणाल्या,”आज हेल्मेट सक्ती आंदोलनाला आमदार आणि खासदाराना बोलावले होते. ते लोक प्रतिनिधी आहेत लोकांच्या सुविधेसाठी, अडचणीसाठी त्या लोकप्रतिनिधी काम केले पाहिजे. आमदार मेधा ताई आल्या जरा बरे वाटले. पण हेल्मेट सक्तीच्या विरोधात घोषणा दिल्या त्या सत्तेवर असल्याच्या विरोधातच असतात त्या पदावर बसलेल्या खुर्चीला असतात. पण आमदार मेधा ताईला राग आला आणि आमच्या पक्षाच्या विरोधात घोषणा द्यायच्या नाही असा दमच भरला. पण पुणेकर असल्या दमाला भीक घालणारे नाही”.