Hema Malini | ड्रीम गर्ल हेमा मालिनीचे होणार होते सीक्रेट लग्न; मुलाखतीमध्ये केला खुलासा

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडची ड्रीम गर्ल (Bollywood Dream Girl) अर्थात हेमा मालिनी हिने तिच्या काळामध्ये सिनेविश्व गाजवले आहे. सुंदरतेचं मुर्तीमंत उदाहरण असलेली हेमा मालिनी (Hema Malini) हिच्यावर लाखो लोक जीव ओवाळून टाकत होते. फक्त एवढेच नाही तर बॉलीवुडमधील अनेक नायक तिच्या सौंदर्यात घायाळ झाले होते. अनेक अभिनेत्यांना हेमा मालिनीसोबत विवाह करण्याची इच्छा होती. यामध्ये प्रामुख्याने अभिनेता जितेंद्र (Jeetendra) व अभिनेता संजीव कुमार (Sanjeev Kumar) यांचे नाव पुढे होते. इंडस्ट्रीमधील यशस्वी असलेल्या या अभिनेत्यांना हेमा मालिनीसोबत लग्न करायचे होते. अगदी त्यांचे लग्न होणार देखील होते. अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांनी त्याच्या लग्नाबाबतचे सत्य एका मुलाखतीमध्ये सांगितले.

लाखो दिलों की धडकन असलेल्या हेमा मालिनी (Hema Malini Marriage) यांनी 1980 साली अभिनेता धर्मेंद्र (Dharmendra) यांच्यासोबत लग्न केले. धर्मेंद्र यांचे हे दुसरे लग्न होते. हेमा मालिनीवर बॉलीवुडमधील अनेक अभिनेत्यांना प्रेम झाले होते. अनेकांची ती ड्रीम गर्ल बनली होती. अभिनेते संजीव कुमार यांनी हेमा मालिनीला (Sanjeev Kumar And Hema Malini) प्रपोज देखील केले होते. त्यांनी त्रिशूल (Trishul), शोले (Sholay), सीता और गीता (Sita Aur Geeta) यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. मात्र हेमा मालिनीच्या घरांच्याना हे नाते (Hema Malini Affairs) मान्य नसल्यामुळे हेमा मालिनीने हे नाते नाकारले व संजीव यांच्यापासून लांब राहण्यास सुरुवात केली. त्यानंतर संजीव यांनी देखील पुढे कोणावर प्रेम केले नाही व लग्न देखील केले नाही. ड्रीम गर्लने नाकारल्यामुळे ते अविवाहित राहिले. पुढे वयाच्या 47 व्या वर्षी हार्ट अटैकने निधन झाले. हेमा मालिनी यांचे जितेंद्र यांच्याशी जवळजवळ लग्न होणार होते.

हेमा मालिनीच्या घरांच्या तिचे लग्न अभिनेते जितेंद्र (Hema Malini And Jeetendra) यांच्याशी व्हावे असे वाटत होते. जितेंद्र यांच्या परिवारालाही हे नाते मंजूर होते. हेमा यांची आई जया चक्रवर्ती (Jaya Chakraborty) यांनी तिचे मन जितेंद्र यांच्याशी लग्न करण्यासाठी वळवले. हेमा मालिनी व जितेंद्र यांचे चैन्नईमध्ये सीक्रेट लग्न (Hema Malini And Jitendra Secret Wedding) पार पडणार होते. मात्र याची खबर बाहेर लागली. त्यावेळी हेमा मालिनीच्या लग्नामध्ये तिचे आशिक धर्मेंद्र यांनी घुसून त्यांचे हे लग्न मोडले. जितेंद्र यांची तेव्हाची गर्लफ्रेंड शोभा यांना घेऊन ते तिथे गेले व हेमाचे लग्न मोडले. त्यानंतर 1980 साली हेमा व धर्मेंद्र यांनी विवाह (Hema And Dharmendra Marriage) केला.

याबाबत हेमा मालिनी (Hema Malini) म्हणाल्या की, “आयुष्यात असे प्रसंग होत असतात. कधी कोणती गोष्ट मनामध्ये नाही ठेवली पाहिजे. राग विसरुन माफ करुन टाकलं पाहिजे. व आयुष्यात पुढे जायला पाहिजे. त्यांची व धर्मेंद्र यांची लव्ह स्टोरी खूप गाजली होती. अनेक चित्रपटामध्ये त्यांनी स्क्रीन शेअर केली होती.”

Web Title :  Hema Malini | hema malini talks about her relationships with jeetendra and sanjeev kumar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा