Hemant Jogdeo | ज्येष्ठ क्रीडा पत्रकार हेमंत जोगदेव यांचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Hemant Jogdeo | मराठी क्रीडा पत्रकारितेतील मेरुमणी अशी ओळख असलेले ज्येष्ठ क्रीडा पत्रकार हेमंत जोगदेव यांचे निधन झाले. ते ९६ वर्षाचे होते. बुधवारी रात्री साडेअकरा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

हेमंत जोगदेव यांनी क्रीडा पत्रकार म्हणून केसरीमध्ये दीर्घकाळ पत्रकारिता केली. सेवानिवृत्तीनंतरही ते अनेक वृत्तपत्रात लेखन करीत होते. मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने हेमंत जोगदेव यांच्याकडे ऑलिंपिक कोशाची जबाबदारी सोपविली होती. त्याचे महत्वाचे काम जोगदेव यांनी केले होते. मराठी क्रीडा पत्रकारांना सुरुवातीच्या काळात ऑलिंपिक स्पर्धांचे थेट मैदानातून वृत्तांकन करण्याची संधी फारशी मिळायची नाही. ऑलिंपिक स्पर्धा चे वृत्तांकन करण्यासाठी जाणाया पहिल्या काही क्रीडा पत्रकारांमध्ये जोगदेव यांचा समावेश होतो. हेमंत जोगदेव यांनी क्रीडा क्षेत्रावर दहापेक्षा अधिक पुस्तकं लिहिली आहेत. ऑलेम्पिया येथे भेट देऊन आल्यानंतर त्यांनी ऑलेम्पिक्सच्या उगमाशी हे पुस्तक १९७६ साली लिहिले.

ऑलिम्पिकच्या प्राचीन ते आधुनिक इतिहासाचा जोगदेव यांचा दांडगा अभ्यास आहे.
त्यातूनच त्यांनी ऑलिम्पिकवर आणखी काही पुस्तके लिहिली.
ऑलिम्पिकचा इतिहास अत्यंत चिकित्सक व शास्त्रशुद्ध पद्धतीने मराठीमध्ये प्रथमच मांडण्यात आला होता.
क्रीडा पत्रकारिता हे त्यांचे पुस्तक देखील नव्या पिढीतील क्रीडा पत्रकारिता करणारया पत्रकारांसाठी मार्गदर्शक आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra State Excise Department | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई ! अवैध दारूसह सुमारे 2 कोटी 82 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Pimpri Chinchwad Police | पिंपरी चिंचवड पोलिसांचा पुढाकार, दिशा भरकटलेली बालके खेळणार ‘स्लम सॉकर’ राष्ट्रीय स्तरीय फुटबॉल स्पर्धेत