Pimpri Chinchwad Police | पिंपरी चिंचवड पोलिसांचा पुढाकार, दिशा भरकटलेली बालके खेळणार ‘स्लम सॉकर’ राष्ट्रीय स्तरीय फुटबॉल स्पर्धेत

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Chinchwad Police | गुन्हेगारी मार्गावर दिशा भरकटलेल्या बालकांसाठी त्यांच्या उर्जेला योग्य दिशा मिळावी यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून दिशा उपक्रम राबवण्यात येत आहे. दिशा उपक्रमांतर्गत घडलेल्या दोन फुटबॉल खेळाडूंची ‘स्लम सॉकर’ या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी क्रीडा प्रशिक्षकासह खेळाडूंचे अभिनंदन केले. हा उपक्रम पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे.

भरकटलेल्या बालकांना योग्य दिशा मिळावी या दृष्टीकोणातुन वस्ती, झोपडपट्टी भागात विशेष बाल पथक, गुन्हे शाखा हे संदेश बोर्डे स्पोट्स फाउंडेशन यांच्या मदतीने संपूर्ण शहरात क्रीडा उपक्रम राबवत आहेत. या उपक्रमामध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 18 पोलीस ठाण्यातील 35 पोलीस अधिकारी यांनी आपआपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत फुटबॉल मैदान उपलब्ध करुन दिले आहे. एकूण 31 फुटबॉल टिम तयार करण्यात आल्या असून संदेश बोर्डे फाऊंडेशनचे फुटबॉल कोच या मुलांना प्रशिक्षण देत आहेत.

नुकत्याच नागपुर येथे पार पडलेल्या ‘स्लम सॉकर’ या महाराष्ट्र राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेमध्ये पुणे जिल्हा टीमच्या मुलांच्या संघाने द्वितीय आण मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केले होते. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी क्रीडा प्रशिक्षकासह सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.

याशिवाय 29 फेब्रुवारी पासून कोलकत्ता येथे होणाऱ्या ‘स्लम सॉकर’ या राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या दिशा उपक्रमातील दोन उत्कृष्ट फुटबॉल खेळाडूंची निवड झाली आहे. या खेळाडूंना पोलीस आयुक्तांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे, क्रीडा प्रशिक्षक संदेश बोर्डे व त्यांचे सहकारी, कोच, समाजसेविका, प्राजक्ता रुद्रवार, तसेच विशेष बल पोलीस पथकाकडील दिशा टीम उपस्थित होती.

Punit Balan Group (PBG) – Friendship Cup | पुनित बालन ग्रुप प्रेझेंट्स ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा ! नादब्रह्म सर्ववादक, रंगारी रॉयल्स्, दगडुशेठ वॉरीयर्स, जोगेश्वरी जॅग्वॉर्स, महालक्ष्मी मॅव्हरीक्स्, श्री राम पथक, गरूड स्ट्रायकर्स संघांची विजयी कामगिरी

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : ‘मी इथला भाई आहे’ सुट्ट्या पैशांवरुन रिक्षा चालकाकडून प्रवाशाला दगडाने मारहाण, आरोपी गजाआड

Maharashtra News | काय सांगता ! होय, चक्क मुख्यमंत्र्यांची खोटी स्वाक्षरी ! मुख्यमंत्री सचिवालयाकडून पोलिसांत तक्रार

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : जुन्या वादातून तरुणाला सिमेंटच्या ब्लॉकने मारहाण, 6 जणांना अटक