Maharashtra State Excise Department | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई ! अवैध दारूसह सुमारे 2 कोटी 82 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra State Excise Department | आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने अवैध दारू निर्मिती, वाहतूक व विक्रीवर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. गेल्या दोन महिन्यात 2 कोटी 81 लाख 91 हजार 349 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Pune Crime News)

राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथकाने 1 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीत छापे टाकत 426 वारस गुन्ह्यांची नोंद व 411 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत 20 हजार 675 लिटर गावठी हातभट्टी दारू, 761 लिटर देशी मद्य, 18 हजार 295 लिटर विदेशी मद्य, 138 लिटर बिअर व 1 हजार 823 लिटर ताडीसह 36 वाहने असा मुद्देमाल जप्त केला आहे.(Maharashtra State Excise Department)

महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 93 अंतर्गत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद असलेल्या व सराईत आरोपी विरूद्ध चांगल्या वर्तणूकीचे बंधपत्रासाठी दाखल 442 प्रस्तावांपैकी 248 जणांचे बंधपत्र घेण्यात आले आहे. 97 लाख 71 हजार रुपये बंधपत्राची रक्कम घेण्यात आली आहे. बंधपत्र घेतल्यानंतर 41 प्रकरणांत नियमाचे उल्लंघन निदर्शनास आले.

1 एप्रिल 2023 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार अवैध मद्य विक्री करणाऱ्या विरुद्ध तसेच अवैध ठिकाणी मद्य सेवन करणाऱ्या ग्राहकांविरुद्ध कारवाई करून 203 गुन्हे नोंदवले. त्यामधील 468 आरोपीना अटक करुन न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने 170 आरोपींना दोषी ठरविले असून या आरोपींना 5 लाख 83 हजार 100 रूपये इतका दंड ठोठावला आहे. यामुळे अवैध मद्य विक्री करणाऱ्यांसोबतच अवैध ठिकाणी मद्यसेवन करणाऱ्या ग्राहकांनाही चाप बसणार आहे.

अवैध मद्य व्यवसायात गुंतल्याबद्दल वारंवार गुन्हे नोंदविलेले तसेच प्रतिबंधात्मक कारवाई करुनही वर्तणुकीत बदल झाला नाही अशा आरोपीविरूद्ध एम.पी.डी.ए कायदा 1981 अंतर्गत पोलीस कारवाई करण्यात येते. यामध्ये दाखल 48 प्रकरणात पोलीस आयुक्तालयाकडून कारवाई करून 10 आरोपी विरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. परवानाकक्ष नमुना एफएल-3 अनुज्ञप्ती विरुद्ध एकूण 249 नियमभंग प्रकरणे, त्यापैकी 3 निलंबन संख्या व 44 लाख 90 हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

बिअर/वाईन शॉपी (एफएलबीआर-2) अनुज्ञप्ती विरुद्ध 44 नियमभंग प्रकरणे, 15 निलंबन संख्या, 7 लाख 30 हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला असून 4 आरोपींचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. किरकोळ अनुज्ञप्ती कक्षाबाहेरील तसेच रूफ टॉप विरूद्ध 34 नियमबाह्य प्रकरणात कारवाई केलेली असून 17 लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

कारवाईसाठी 14 नियमित व 3 विशेष पथके तयार

आगामी लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री तसेच परराज्यातील मद्य, अवैध ताडी आदींची विक्री, अवैध ढाब्यांवर मद्याची विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने एकुण 14 नियमित व 3 विशेष पथके तयार केली आहेत. ठिकठिकाणी तपासणी नाके उभारण्यात येणार आहेत. तसेच रात्रीची गस्त घालण्यात येणार आहे. राज्याचा महसूल चुकवून परराज्यातून येणाऱ्या मद्य साठ्यावर तसेच किरकोळ अनुज्ञप्तीचे व्यवहार विहीत वेळत चालू नसल्यास व काहीही आक्षेपार्ह आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

ही कामगिरी राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य विजय सुर्यवंशी, संचालक अमलबजावणी व दक्षता सुनील चव्हाण, विभागीय उपायुक्त पुणे विभाग सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. नागरिकांना अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री याबाबत माहिती मिळाल्यास टोल फ्री क्र. 1800233999 व दूरध्वनी क्र. 020-26058633 या क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क पिंपरी चिंचवड विभागाचे उपअधीक्षक सुजित पाटील यांनी केले आहे.

Prakash Ambedkar On Pune Lok Sabha | जालन्यातून जरांगेंना तर पुण्यातून डॉ. वैद्य यांना उमेदवारी द्या, ‘वंचित’ची मविआ बैठकीत मागणी, दिले ‘हे’ 4 प्रस्ताव

Punit Balan Group (PBG) – Friendship Cup | पुनित बालन ग्रुप प्रेझेंट्स ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा ! नादब्रह्म सर्ववादक, रंगारी रॉयल्स्, दगडुशेठ वॉरीयर्स, जोगेश्वरी जॅग्वॉर्स, महालक्ष्मी मॅव्हरीक्स्, श्री राम पथक, गरूड स्ट्रायकर्स संघांची विजयी कामगिरी

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : ‘मी इथला भाई आहे’ सुट्ट्या पैशांवरुन रिक्षा चालकाकडून प्रवाशाला दगडाने मारहाण, आरोपी गजाआड

Maharashtra News | काय सांगता ! होय, चक्क मुख्यमंत्र्यांची खोटी स्वाक्षरी ! मुख्यमंत्री सचिवालयाकडून पोलिसांत तक्रार

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : जुन्या वादातून तरुणाला सिमेंटच्या ब्लॉकने मारहाण, 6 जणांना अटक