हे उपकरण शोधणार छुपा कॅमरा 

लंडन : वृत्तसंस्था – अनेकदा आपण शाॅपिंग करण्यासाठी एखाद्या माॅलमध्ये किंवा प्रशस्त अशा दुकानात जातो. कपडे घेण्यापूर्वी ते आपल्याला व्यवस्थित बसतात का हे आपण चेक करतो. परंतु त्या चेंजिंग रूमध्ये कॅमेरा असण्याची धास्तीही आपल्याला खात असते कारण अशा अनेक घटना समोर आल्या आहेत की चेंजिंग रुममध्ये कॅमेरे होते आणि त्याद्वारे व्हिडिओ व्हायरल झाले. त्यामुळे चेंजिंग रूम सेफ असतात की नाही हे आपल्याला माहीत नसते. परंतु आता घाबरण्याचे काही कारण नाही. कारण आता एक उपकरण विकसित करण्यात आले आहे ज्याच्यामुळे एका मिनिटातच अशा कॅमेऱ्यांचा छडा लावला जाऊ शकतो.
अनेक विकृत प्रवृत्तीची माणसे समाजात असतात जे असे छुपे कॅमेरे लपवून ठेवतात आणि यात शूट केलेल्या व्हिडिओ च्या साहाय्याने ब्लॅकमेलिंग केले जाते. या कॅमेऱ्याच्या मदतीने अनेकजण हेरेगिरीही करतात. बाथरूमच्या खिडकीची तावदाने, झरोके, पेंटिंग, फुलदाण्या अशा अनेक ठिकाणी हे कॅमेरे असण्याची दाट शक्यता असते. परंतु आता या उपकरणाच्या साहाय्याने तुम्ही असे कॅमेरे सहज शोधू शकता.
हे उपकरण केवळ ऑन करून चारही दिशांना फिरवले की, ते छुपा कॅमेर्‍याचा छडा लावू शकते. अशावेळी हा कॅमेरा या उपकरणामध्ये दिसू लागतो आणि आपण सहजपणे त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो. यामुळे अनेक लोकांना फायदा होईल. अशा व्हिडिओ मुळे होणाऱ्या दुर्घटनाही टाळल्या जाऊ शकतात. म्हणून हे उपकरण अतिशय उपयुक्त असे ठरणार आहे.