संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ निघणाऱ्या उद्याच्या मोर्चाला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन
संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ निघणाऱ्या उद्याच्या (२८ मार्च) मोर्चाला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. पुण्यातील शनिवारवाड्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा होता. मात्र, शिवप्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांच्या नियोजनावर पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

मोर्चा निघणारच फक्त मार्ग बदलणार : पराशर मोने
संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ निघणारा शिवप्रतिष्ठानचा मोर्चा शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयअसा निघणार होता. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली. मात्र आम्ही सकाळी दहा वाजता ओंकारेश्वर मंदिराजवळील नदीपात्रात जमून तेथून कसबा गणपती आणि लाल महालापर्यंत चालत जाणार असल्याचे शिवप्रतिष्ठानकडून सांगण्यात आले.