अमित शाह यांना मुंबई हायकोर्टाचा दिलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन  – सोहराबुद्दीन चकमकीप्रकरणी मुंबई हायकोर्टाने भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना दिलासा दिला आहे. बॉम्बे लॉयर्स असोसिएशनने या चकमक प्रकरणी टाकली होती परंतु याचिकाकर्त्यांकडे ठोस मुद्दाच नाही, असे सांगत हायकोर्टाने ही याचिका फेटाळली आहे.

सोहराबुद्दीन शेख एन्काऊंटर प्रकरणात हायकोर्टात अपील न करण्याचा सीबीआयचा निर्णय कोर्टाने योग्य ठरवला आहे. न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठानं हा निकाल दिला. या निकालाला बॉम्बे लॉयर्स असोसिएशननं सर्वोच्च न्यायालयात आव्हान बॉम्बे लॉयर्स असोसिएशनकडून सांगण्यात आलं आहे.

२०१९ मध्ये कमळच फुलणार, सी वोटर्स आणि एबीपी माझाचा सर्वे 

सोहराबुद्दीन शेख बनावट चकमकप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने डिसेंबर २०१४ मध्ये अमित शहा यांना खटल्यातून दोषमुक्त केले होते. या निर्णयाला सीबीआयने वरिष्ठ न्यायालयात आव्हान दिले नव्हते. सीबीआयच्या या भूमिकेविरोधात ‘बॉम्बे लॉयर्स असोसिएशन’ने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. सीबीआयला कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्याचे आदेश द्यावे, असे या याचिकेत म्हटले होते. मात्र, हायकोर्टाने ही याचिकाच फेटाळल्याने अमित शाहांना दिलासा मिळाला आहे.

जाहिरात

काय आहे प्रकरण ?
सोहराबुद्दीन आणि त्याची बायको कौसर बी यांना गुजरात पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने पकडल्याचा ठपका होता. पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी सोहराबुद्दीनचे संबंध असल्याचा दावा गुजरात पोलिसांनी केला होता. नोव्हेंबर २००५ मध्ये सोहराबुद्दीनला गांधीनगरजवळ एका चकमकीत ठार मारण्यात आले. या बनावट चकमकीचे नियोजन करण्यात गुजरातचे तत्कालीन गृह राज्यमंत्री अमित शहा यांचा सहभाग होता, असा आरोप होता. डिसेंबर २०१४ मध्ये न्यायालयाने अमित शहा यांना या प्रकरणातून आरोपमुक्त केले होते.

जाहिरात