High Court | मांसाहारावरून उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले

अहमदाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – High Court | अहमदाबादमध्ये रस्त्यावर मांसाहारी पदार्थ विकणाऱ्या फेरीवाल्यांच्या विरोधात महापालिकेने (Ahmadabad Corporation) मोहीम उघडली होती. त्यावरून गुजरात उच्च न्यायालयाचे (Gujarat High Court) न्या. बिरेन वैष्णव (Justice Biren Vaishnav) यांनी महापालिकेला फटकारले आहे. घराबाहेर पडल्यानंतर लोकांनी काय खायचे, हे तुम्ही का ठरवत आहात? असा सवाल न्यायालयाने (High Court) उपस्थित करत मोहिमेविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली.

युक्तिवादावेळी रस्त्यावरील फेरीवाल्यांवर कारवाई करताना आम्ही कोणताही भेदभाव केला नाही, असे महापालिकेने न्यायालयाला (Gujarat High Court) सांगितले होते. दरम्यान, वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा कोणालाच अधिकार नाही. त्यामुळे अहमदाबाद महापालिकेला उच्च न्यायालयाने फैलावर घेतले, हे योग्यच असल्याचे मानवी हक्क कार्यकर्ते व वकील के. आर. कोष्टी (Adv K.R. Koshti) यांनी म्हंटले आहे.

सुनावणीवेळी न्या. बिरेन वैष्णव यांनी अहमदाबाद महापालिकेला खडसावले असून घराबाहेर कोणी काय खायचे हे तुम्ही कसे काय ठरवू शकता? सत्तेवर असलेल्या लोकांच्या मनात आले, त्याप्रमाणे तुम्ही मोहिमा राबवता काय? उसाच्या रसामुळे मधुमेहाचा धोका असल्याने तो पिऊ नका, असे महापालिका आयुक्त उद्या मला सांगू लागतील. परंतु महापालिकेला हे सांगण्याचा अधिकार काय? असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला.

 

Web Title :- High Court | who are you decide what people want eat court ask question ahmadabad municipal corporation Gujarat High Court

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Ankita Lokhande | लवकरच अंकिता लोखंडेच्या घरी वाजणार सनई चौघडे; 3 दिवसानंतर होणार ‘नवरी’

MLA Gopichand Padalkar | एसटी कामगार संपावरून पडळकरांचा सरकारवर आरोप; म्हणाले – ‘मिल कामगारांचा संप चिघळवला, त्याच पद्धतीने..’

National Lok Adalat Pune | पुणे महापालिकेमध्ये आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 734 प्रकरणे निकाली