Ankita Lokhande | लवकरच अंकिता लोखंडेच्या घरी वाजणार सनई चौघडे; 3 दिवसानंतर होणार ‘नवरी’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Ankita Lokhande | बॉलिवूडमध्ये चांगलीच लगीसराई चालू आहे. नुकतेच विकी कौशल आणि कटरीना कैफ लग्नबंधनात (Vicky-Katrina Marriage) अडकले. अंकिता लोखंडे सुद्धा आता लग्नबंधनात अडकणार आहे. प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आधी सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh) सोबत रिलेशनमध्ये होती. मात्र दोघांच्या ब्रेक्रअप नंतर मागील तीन वर्षापासून अंकिता तिचा बॉयफ्रेंड विक्की जैनसोबत रिलेशनमध्ये आहे.

 

 

अंकिता आणि विकी लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर चांगल्याच रंगल्या आहेत. अंकिता (Ankita Lokhande) आणि विक्की (Vicky Jain) 14 डिसेंबरला लग्न करणार आहे. तर अंकिताचं हे लग्न जवळपास तीन दिवस चालणार आहे. 12 तारखेला मेहंदीचा सोहळा असणार आहे. तसेच 12 तारखेच्या रात्री त्या दोघांचा साखरपुडा देखील केला जाणार आहे. दोघांच्या हळदीचा समारंभ 13 तारखेला होणार असून, त्यासाठी त्यांनी काही खास थीम ठेवली आहे. तसेच या दोघांचे लग्न ग्रँड हयातमध्ये (Grand Hyatt) होणार आहे.

 

दरम्यान, 14 तारखेला अंकिता आणि विक्की लग्नबंधनात अडकणार असून, लग्न दोघेजण मराठमोळ्या पद्धतीने करणार आहेत. लग्नाची थीम पारंपारिक ठेवली असून, लग्न झाल्यानंतर रात्री रिसेप्शन पार्टी सुद्धा आयोजित केले आहे. तसेच काही दिवस आधीच अंकिता संगीत सेरोमनी प्रॅक्टिस करत असताना तिला दुखापत झाली. तिचा पाय फ्रॅक्चर झाला. मात्र नुकतंच अंकिता रिकव्हर होत आहे. तिने याबद्दलच एक व्हिडीओसुद्धा तिच्या सोशल मीडियावरील इंस्टाग्रामचा अकाउंटवर शेअर केला. त्यामध्ये ती एका व्हिल चेअरवर बसलेली दिसून येत आहे. तसेच तिला बघून अनेक चाहत्यांनी लग्नाआधी ती लवकर बरी व्हावी म्हणून प्रार्थनांचा वर्षाव केला आहे.

 

 

 

Web Title :- Ankita Lokhande | ankita lokhande vicky jain wedding haldi to reception complete timeline

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

MLA Gopichand Padalkar | एसटी कामगार संपावरून पडळकरांचा सरकारवर आरोप; म्हणाले – ‘मिल कामगारांचा संप चिघळवला, त्याच पद्धतीने..’

National Lok Adalat Pune | पुणे महापालिकेमध्ये आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 734 प्रकरणे निकाली

Life Certificate | UIDAI ने दूर केली पेन्शनर्सची सर्वात मोठी समस्या, घरबसल्या होईल Pension चे हे काम

Samantha Prabhu | पुष्पाच्या आयटम साँगमधील सामंथा प्रभूच्या ग्लॅमरस अवताराने चाहत्यांच्या हृदयाची वाढवली धडधड