High Court | ‘पत्नीने अपरात्री परपुरूषाला फोन करणं म्हणजे वैवाहिक क्रुरपणा’ – हायकोर्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – High Court | केरळ न्यायालयाने (Kerala High Court) एका जोडप्याचा घटस्फोट मंजूर करताना दिलेल्या आदेशाची चर्चा सगळीकडे होताना दिसत आहे. ऐकायला वेगळा वाटत असला तरी केसही तशाप्रकारची आहे. पतीने सांगूनही जर पत्नी संधी साधून परपुरूषाला गुप्तपणे फोन करत असेल तर हा वैवाहिक क्रूरतेसारखा प्रकार आहे, असं न्यायालयाने (High Court) म्हटलं आहे.

 

जोपर्यंत वैवाहिक जीवन हे पहिल्यासारखं होत नाही, तोपर्यंत फक्त तडजोड करणं म्हणजे क्रूरतेचं समर्थन होणार नाही, असं न्यायमूर्ती कौसर एडप्पागथ यांनी आपल्या आदेशात सांगितलं.

 

या प्रकरणी पतीने हायकोर्टात (High Court) याचिका दाखल केली होती. मात्र, त्याची ही याचिका फेटाळली गेली होती. पतीने असा दावा केला होता की, लग्नाच्या सुरुवातीपासूनच पत्नीने त्याच्या आयुष्याला एकप्रकारे नर्क बनवून अनेक प्रकारची अनैतिक कृत्ये केली आहेत. त्याने असाही आरोप केला की त्याच्या पत्नीचे लग्नाआधी दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंध (Immoral relations) होते, जे लग्नानंतरही तसेच सुरु राहिले.

पतीकडून बाजू मांडणाऱ्या वकिलांनी, बीएसएनलकडून (BSNL) मिळवलेल्या सीडीच्या प्रिंट आऊटवरून लक्षात येतं की,
पत्नीचे एका परपुरूषासोबत वारंवार फोन झाले असून त्यांचे एका अनैतिक संबंध असल्याचा इशारा करतात.
यावर पत्नीची बाजू मांडणाऱ्या वकिल एम. बी. संदीप यांनी, पत्नी केव्हातरीच ते फोन करत होती.
त्यासोबतच त्यांनी या दाव्याचं खंडण देखील केलं आहे.

 

दरम्यान, पत्नी फक्त फोन करत होती म्हणजे त्यांचं नात खराब किंवा त्यांचे अनैतिक संबंध होते असं होत नाही.
परंतु पतीने सांगूनही रात्री उशिरा परपुरूषाला फोन करणं हा वैवाहिक क्रूरतेसारखाच (Marital cruelty) प्रकार असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे.

 

Web Title :- High Court | wife secret call after warning of husband is marital cruelty high court

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा