खुशखबर ! सोन्याच्या दरात तीन वर्षातील सर्वात मोठी ‘सूट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थसंकल्प जाहीर केल्यानंतर धातूंच्या आयात शुल्कात २.५ टक्के वाढ करण्याची घोषणा करण्यात आल्यानंतर सोन्याच्या दरात वेगाने वाढ झाली आहे आणि सोने बाजारात मागील आठवड्यात गुरुवारी सर्वात आधिक म्हणजे ३५,१४५ रुपये प्रति १० ग्राम झाला आहे. सोन्याच्या भावात वाढ झाल्याने घाऊक बाजारात मागणी कमी झाली आहे त्यामुळे सोन्याच्या भावावर ३० डॉलर प्रति औंस पर्यंत सूट देण्यास सुरुवात केली आहे. ही मागील ३ वर्षातील सर्वात आधिक सूट आहे.

केडिया कमोडिटीचे डायरेक्टर अजय केडिया यांनी सांगितले की, अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर भारतात सोन्याचे भाव प्रिमियम अधिमूल्यावर चालू आहेत, परंतू सोन्यावर आयात शुल्कात वाढ झाल्यानंतर सोन्याच्या भावात सूटने फायदा झाला आहे.

२४३ रुपये म्हणजेच ०.७० टक्के वाढीने ३४,९४४ रुपये प्रति १० ग्राम वर बंद झाली. एमसीएक्स वर सोन्याचे भाव गुरुवारी ३५,१४५ रुपये प्रति १० ग्राम पर्यंत वाढ झाली होती. हा आता पर्यंतचा सर्वात आधिक भाव आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कॉमेक्सवर सोन्याचा भाव मागील सप्ताहात शेवटच्या सत्रात शुक्रवारी १०.९५ डॉलर म्हणजेच ०.७८ टक्के वाढून १,७१७,६५ डॉलर प्रति औंसवर बंद झाला होता.

सीमा शुल्कात वाढ झाल्यानंतर सोन्याच्या आयात दरात वाढ झाली आहे. सरकारच्या या निर्णयाचा हेतू सोन्याच्या आयातीत कमी झाली आहे. कारण सोन्याच्या आयातीत आधिक प्रमाणात विदेशी चलनाची आवश्यकता लागते.

 गोरी त्वचा हवी असेल तर करा हे घरगुती उपाय

‘परफेक्ट’ लिपस्टिक लावण्यासाठी काही खास टिप्स – जाणून घ्या

हृदयाच्या रक्तवाहिनी च्या आजारामुळे होतात छातीत वेदना

आरोग्यदायी जीवनासाठी नियमित दूध घ्यायलाच हवे

चांगल्या आरोग्यासाठी जीम मध्ये जाण्यास वेळ नसेल तर ‘हे’ करा

सावधान ! समुद्रात आंघोळ करणार असाल तर हे तुमच्यासाठीच आहे, जरूर वाचा

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like