Hina Khan | ब्रेकअपच्या चर्चांवर अखेर हिना खानने सोडले मौन ; म्हणाली “आगामी वेब सिरीज…”

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आपल्या अभिनयाने त्याच बरोबर सौंदर्याने अभिनेत्री हिना खानने (Hina Khan) वेळोवेळी चाहत्यांची मन जिंकली आहेत. मालिका विश्वातून ती घराघरात पोहोचली होती. सध्या हिना खान (Hina Khan) तिच्या लव लाइफमुळे खूपच चर्चेत आहे. हिनाने मध्यंतरी शेअर केलेल्या पोस्टमुळे तिचे ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर या चर्चांवर हिना खानने मौन सोडले आहे आणि या पोस्टमागील सत्य परिस्थिती सांगितली आहे.

 

हिना खानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या खाजगी आयुष्य आणि बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालशी असलेल्या संबंधाबद्दल खुलासा केला. यावेळी तिला तिने शेअर केलेल्या पोस्ट बद्दल विचारण्यात आले होते. या पोस्ट बद्दल स्पष्टीकरण देताना हिना म्हणाली, “मी केलेल्या पोस्टमुळे सगळ्यांनाच गैरसमज झाले. मला अनेक मेसेज फोन कॉल्स देखील येऊ लागले. मला करिश्मा तन्नाचाही फोन आला, सर्व काही ठीक आहे ना म्हणून. मात्र मी सगळ्यांना सांगू इच्छिते की देवाच्या कृपेने माझे लव लाइफ उत्तम चालले आहे. मी जी पोस्ट केली होती ती माझ्या आगामी वेब सिरीज ‘षडयंत्र’ बद्दल होती. पण या पोस्टमुळे अनेकांचा गैरसमज झाला”.

 

हिना खानच्या (Hina Khan) आगामी वेब सिरीजमध्ये चंदन रॉय, सान्याल आणि कुणाल रॉय कपूर देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
तर हिना खान आणि रॉकी यांच्या लव स्टोरीची सुरुवात ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून झाली होती.
सुरुवातीला ते दोघे चांगले मित्र होते त्यानंतर आठ वर्ष ते एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी त्यांच्या नात्याची जाहीरपणे कबुली दिली.
तर बिग बॉस 11 मध्ये हिना खानला रॉकीने सर्वांसमोर प्रपोज केले होते.

 

Web Title :- Hina Khan | hina khan break silence on breakup rumours with boyfriend rocky jaiswal

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Weight Loss Tips | “या” वस्तूने कमी होईल वाढणारे वजन; अलाया एफ (Alaya F) सारखे सपाट पोट

Bank Rules Change | १ जानेवारीपासून बदलणार बँकेचे हे नियम, जाणून घ्या तुमच्यावर कोणता परिणाम होणार

Ankita Lokhande | टीव्ही इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडेचे बोल्ड फोटो होताहेत व्हायरल