‘या’ वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आली एन्काऊंट स्पेशलिस्ट IPS नवनीत यांची रिअल स्टोरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – या IPS अधिकाऱ्याचे नाव ऐकताच शहरातील गुन्हेगारांना घाम फुटतो, या अधिकाऱ्याची जेथे कुठे पोस्टिंग होते तेथे गुन्हेगारीचा टक्का कमी होतो. याच अधिकाऱ्यांचे किस्से तरुणांना प्रेरित करतात. अशा शूर अधिकारी असलेल्या नवनीत सिकेरा यांच्यावर आधारित वेब सीरिज भौकाल प्रदर्शित झाली आहे. या सिरिजमध्ये सिकेरा यांची भूमिका प्रसिद्ध मालिका अभिनेता आणि देवाें के देव महादेवमध्ये काम करणारे भगवान शंकराची भूमिका निभावणारे मोहित रैना निभावणार आहे. अभिनेता आणि निर्माता बावेजा याचे क्रिएटर आणि शो रनर आहेत. या सीरिजमध्ये नवनीत सिकेरा यांच्याद्वारे केले गेलेले एकाऊंटर यासह पोलिसांची बदलत जाणारी प्रतिमा याबद्दल सांगण्यात आले आहे.

मोहित रैना काय म्हणाले –
भौकालमध्ये मला एका शूर पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका निभावण्याची संधी मिळत आहे. ज्यांनी जुन्या काळापासून चालत आलेल्या गुन्हेगारी आणि स्थानिक राजनैतिक संबंधाना तोडले आणि बदलले. मी ही भूमिका साकारत असल्याने खूश आहे.

नवनीत सिकेरा त्यांच्या कार्यकाळात पहिल्यांदा उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये एसएसपी म्हणून तैनात झाले. तेव्हा तेथील लोकांमध्ये स्थानिक गुंडांची भीती होती. अपहरण, हत्या हे साधारण झाल्यासारखी परिस्थिती होती. परंतु सिकेरा यांच्या नियुक्तीनंतर स्थानिक गुन्हेगारी गॅंग कमी झाल्या आणि गुन्हेगारांसाठी ओळखले जाणार मुजफ्फरनगर एक शांत जिल्हा झाला. या वेब सीरिजची शुटिंग लखनऊच्या बाराबंकी आणि त्या परिसरात केले गेले. ज्यात बारांबकीचे मेरठ मुजफ्फरनगरच्या रुपात दाखवले गेले. याशिवाय हजरतगंज, ख्रिश्चन कॉलेज, कैसरबाग सह अनेक ठिकाणी शुटिंग करण्यात आली.

उत्तर प्रदेशात नवनीत सिकोरा हे नाव बरेच नावाजलेले आहे. नवनीत यांचे जीवन एखाद्या बॉलिवूड ब्लॉकबस्टर फिल्मपेक्षा कमी नाही. त्यांचे वडील एक शेतकरी होते. एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या सुरुवातीच्या दिवशांची आठवण सांगितली. जेव्हा एक तक्रार दाखल करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलीस त्रास देत होते, त्याच दिवशी त्यांनी पोलीस अधिकारी बनण्याचा निर्णय घेतला होता.

एन्कांऊटर स्पेशालिस्ट म्हणून प्रसिद्ध –
सिकेरा यांचे नाव ऐकताच मोठ मोठ्या गॅंगस्टरला घाम फुटतो. आयपीएस नवनीत सिकेरा यांनी आतापर्यंत 60 पेक्षा जास्त एनकाऊंटर केले आहेत. त्यांनी कुख्यात गुंड रमेश कालियाच्या दहशतीला देखील संपवले होते. नवनीत सिकेरा यांच्या नेतृत्वात पोलिसांनी वरातीतील असल्याचे भासवून रमेश कालिया यांना मृत्यूच्या दरीत लोटले होते. नवनीत सिकेरा यांनीच उत्तर प्रदेशात महिला हेल्पलाइन 1090 प्रोजेक्ट सुरु केला होता जे पूर्ण राज्यात लागू करण्यात आला. उत्तर प्रदेशात एक अशी देखील वेळ होती जेव्हा कुख्यात गुंडांनी त्रास दिल्यावर लोक पोलीस ठाण्याऐवजी नवनीत सिकेरा यांच्याकडे जात होते.