घरगुती सिलेंडर झाला स्वस्त, पेट्रोलियम कंपन्यांकडून नागरिकांना मोठा दिलासा

नवी दिल्ली:वृत्तसंस्था
सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासा देणारी ही बातमी आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती सिलेंडरच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला असून, विना अनुदानित सिलेंडर आणि 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती जास्त कमी करण्यात आल्या आहेत.

असे आहेत विविध शहरातील सिलेंडरचे नवे दर
1 मे पासून बिगर अनुदानित सिलेंडर

मुंबई : 623 रुपये
दिल्ली: 650.50 रुपये
कोलकाता: 674 रुपये
चेन्नई: 663 रुपये

दिल्लीमध्ये सिलेंडर तीन रुपयांनी कमी झाला आहे.

पहा मुंबईमध्ये सिलेंडरची किंमत किती कमी :
कोलकाता आणि मुंबईमध्ये 2-2 रुपयांनी किंमती कमी झाल्या आहेत. विना अनुदानितच्या सिलेंडरच्या किंमती कमी झाल्याने एक कोटीपेक्षा अधिक लोकांना त्याचाहा फायदा होणार आहे.

सरकारकडून मागील पाच महिन्यांपासून विना अनुदानाच्याच्या सिलेंडरचे भाव कमी करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. दिल्लीमध्ये पाच महिन्यात विना अनुदानित सिलेंडर जवळपास 96.50 रुपये, तर कोलकातामध्ये 92 रुपये, मुंबईमध्ये 96 रुपये आणि चेन्नईमध्ये 93 रुपयांनी स्वस्त झाला आहे.

19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर दिल्लीमध्ये 1167.50 रुपये, कोलकातामध्ये 1212 रुपये, मुंबईमध्ये 1119 रुपये आणि चेन्नईमध्ये 1256 रुपये झाला आहे. एप्रिलमध्ये दिल्लीमध्ये याचा भाव 1176 रुपये, कोलकातामध्ये 1220.50 रुपये, मुंबईमध्ये 1128 रुपये आणि चेन्नईमध्ये 1264.50 रुपये होता.  सबसिडीच्या सिलेंडरच्या किंमतीमध्ये मात्र जास्त घट झालेली नाही.