शुभ वार्ता : नवीन घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी ! दीड डझन बँकांनी एकाच महिन्यात गृह कर्जाचे दर केले कमी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर आपण घर विकत घेण्याचा विचार करत असाल तर हा वेळ तुमच्यासाठी योग्य आहे. कारण एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत दीड डझनहून अधिक बँका आणि एनबीएफसीने गृह कर्जाचे व्याज दर कमी केले आहेत. यात देशातील सर्वात मोठी स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक आणि कोटक महिंद्रा बँकेसारख्या मोठ्या बँकांचा समावेश आहे. पहिल्यांदा २० बँका आणि एनबीएफसी ७ टक्क्यांहून कमी दराने गृहकर्ज देत आहेत.

रिझर्व्ह बँक बँकांना कर्ज देण्यासाठी दबाव टाकत आहे. संकटग्रस्त रियल्टी क्षेत्राला पुनरुज्जीवित करण्यासाठी केंद्रीय बँक आणि सरकारने अनेक पावले उचलली आहेत. अशा परिस्थितीत बँकांकडून कर्जाचा दर कमी केल्याने दिलासा मिळतो. बँकांकडून गृह कर्ज कपात करण्याची स्पर्धा फेब्रुवारीमध्येच सुरु झाली.

विशेष म्हणजे गेल्या नऊ महिन्यांत कोणताही पॉलिसी दर बदललेला नाही. तज्ञांच्या मते, बाजारातील चढ-उतारांमुळे २०२० मध्ये बँकांमध्ये सर्वाधिक एफडी ठेवी असल्याने एका वर्षात बँकांमध्ये बारीक रोख रक्कम जमा झाली आहे. याव्यतिरिक्त, आरबीआयने जाहीर केलेल्या नवीन ऑन- टॅप टीएलटीआरओमुळे बँका आणि एनबीएफसीला रिअल इस्टेटसह विशिष्ट क्षेत्रातील कोर्पोरेट्सना कमीत कमी कर्ज घेण्याची आणि कर्ज देण्याची परवानगी मिळाली.

वेगवेगळ्या बँकांच्या व्याजदराबध्दल जाणून घेऊया –
ICICI बँक : ICICI बँकेने आपल्या गृह कर्जाचा दर कमी करून १० वर्षांच्या नीचांकावर आणला आहे. बँकेने आपल्या गृह कर्जावरील व्याज दर ६.७०% पर्यंत कमी केला आहे. हा कर्ज दर आजपासून लागू करण्यात आला आहे. ICICI बँकेच्या म्हणण्यानुसार ७५ लाख रुपयांचे गृह कर्ज असलेल्या ग्राहकांना या परवडणाऱ्या दरात फायदा मिळेल. ७५ लाख रुपयांपेक्षा जास्त कर्जासाठी बँकेने ६.७५% व्याज दिले आहे. हा दर ३१ मार्चपर्यंत आहे.

SBI : SBI च्या गृह कर्जावरील व्याजदारात ०.१० टक्क्यांनी कपात केली आहे. आता बँक ६.७० टक्के व्याजदराने सीआयबीआयएल स्कोअरवर अवलंबून असतील. या अंतर्गत ३१ मार्च २०२१ पर्यंत कर्ज उपलबध असेल ७५ लाख रुपयांपर्यंतच्या गृह कर्जासाठी व्याज ६.७० टक्के राहील असे बँकेने म्हंटले आहे. ७५ लाख ते पाच कोटी रुपयांच्या कर्जासाठी व्याज ६.७५ टक्के राहील. बँक म्हणाले कि ‘येणो’ अँपच्या माध्यमातून गृह कर्ज घेण्यासाठी अर्ज करू शकतात. असे केल्याने त्याने ०.०५ टक्के अतिरिक्त सूट देण्यात येईल.

HDFC बँक : HDFC च्या ग्राहकांना गृह कर्जावरीळ व्याज दारावर ०.०५ टक्क्यांची सूट देण्यात आली आहे. गृह कर्ज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की चांगले कर्ज घेणाऱ्या ‘सर्वक्षेष्ठ ग्राहकांना’ या कपातीनंतर गृह कर्ज ६.७५ टक्क्यांच्या व्याजावर उपलब्ध होईल. एका अधिकृत निवेदनात म्हंटले आहे की ‘HDFC ने गृह कर्जावरील रिटेल हेड लेन्डिंग रेट मध्ये ०.०५ टाक्यांनी घट केली आहे, जी ४ मार्चपासून प्रभावी झाली आहे. कंपनीच्या गृह कर्जाचे समायोजित दर हेच आरपीएलआरचे मापदंड आहेत.

कोटक महेंद्रा बँक : कोटक महेंद्रा बँकेने गृह कर्जाचे व्याज ०.१० टाक्यांनी कमी केले आहे. या मर्यादित मुदतीत कपात झाल्यानंतर व्याजदर खाली ६.६५ टक्क्यांवर आला आहे. या कपातीसह बँकेचा दावा आहे की ते ग्राहकांना बाजारपेठेतील सर्वात कमी व्याजदराने कर्ज देतील. विशेष ऑफर अंतर्गत ग्राहक ३१ मार्चपर्यंत ६.६५% दराने कर्ज घेण्यास सक्षम असल्याने बँकेने निवेदनात म्हंटले आहे.