Home Loan Tips | त्या 5 चूका, ज्या केल्याने रिजेक्ट होऊ शकते तुमचे ‘होम लोन अ‍ॅप्लीकेशन’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  होम लोनसाठी अर्ज (Home Loan Tips) करताना खुप सावधगिरीने करण्याची आवश्यकता असते. कारण तुमची एक चूक महागात पडू शकते. शिवाय, तुम्ही एखाद्या अशा लेंडर किंवा प्रॉडक्टसोबत जाऊन नये जे तुमच्यासाठी योग्य नाही. होम लोनसाठी अर्ज करताना (Home Loan Tips) आपण कोणत्या प्रकारच्या सामान्य चूका करतो ते जाणून घेवूयात…

सेल्फअसेसमेंट न करणे

उत्कृष्ट क्रेडिट रेटिंगच्या आधारावर चांगल्या व्याजदरावर मोठ्या होम लोनचा लाभ घेऊ शकता. क्रेडिट स्कोअर 700 बेसिक पॉईंटच्यावर चांगला मानला जातो.
यानंतर सर्व कागदपत्र एकत्रित करा. जास्त रक्कम मिळवणे आणि अनुकूल नियम आणि अटी प्राप्त करण्यासाठी एक हाय क्रेडिट स्कोअर आणि चांगली रि-पेमेंट हिस्ट्री आवश्यक असते.

 

रिसर्च वर्क न करणे

होम लोन (Home Loan Tips) सामान्य झाले असून ते सहज उपलब्ध होते. वाढत्या मागणीसह अनेक आर्थिक संस्था विविध योजना प्रदान करतात.
यासाठी एखाद्या संस्थेकडून लोन घेताना योग्य रिसर्च करणे आवश्यक आहे.

घर खरेदी करणार्‍यांनी आपली गरज पुन्हा तपासली पाहिजे, आपल्या फायनान्सची योजना बनवणे, नियम आणि अटी तपासणे, छुपे शुल्क ओळखणे,
प्रोसेसिंग शुल्क फी आणि फ्लेक्सिबल रि-पेमेंट ऑपशन ओळखणे आणि योग्य बँक आणि योजनेची निवड करणे आवश्यक आहे.
अनेक वेबसाइट विविध बँकांद्वारे देण्यात येणार्‍या होम लोन प्रॉडक्टची तुलना करण्याची सुविधा देतात.
शोध न घेतल्यास तुम्हाला अनावश्यक शुल्क किंवा जास्त ईएमआय भरावा लागू शकतो.

शॉर्ट टेन्चर निवडणे

जेवढे शक्य असेल, हा सल्ला दिला जातो की, शॉर्ट टेन्चर होम लोनचा ऑपशन निवडू नका. कालावधी जेवढा छोटा असेल, कर्ज रक्कम तेवढी कमी होईल.
यामुळे हाय ईएमआय पाहता ईएमआय भरताना तो चुकण्याची जोखीम वाढते.

सोबतच, जास्त रक्कम मिळवणे आणि अनुकूल नियम आणि अटी प्राप्त करण्यासाठी एक हाय क्रेडिट स्कोअर आणि चांगली रि-पेमेंट हिस्ट्री आवश्यक असते.
मोठा कालावधी तुमचा ईएमआय सोपा करेल आणि तुमचे फायनान्शियल उद्देश पूर्ण करेल.

परतफेडीची क्षमता चुकीच्या पद्धतीने मोजणे

सामान्यपणे लोक जी सर्वात मोठी चूक करतात ती ही आहे की, ते आपल्या परतफेडीच्या क्षमतेची मोजणी करताना आपल्या मासिक खर्चाचा त्यामध्ये समावेश करत नाहीत.
बँक सामान्यपणे कर्ज देताना जबाबदार्‍या पाहते. जर तुमचा मासिक खर्च जास्त असेल आणि तुम्ही जास्त ईएमआय रक्कमेसह होम लोन घेतले, तर ते एक मोठे आर्थिक संकट निर्माण करू शकते.

तुमचा ईएमआय आऊटफ्लो सामान्यपणे तुमच्या उत्पन्नाच्या 30-40 टक्केपेक्षा जास्त असून नये.
तुमच्या उत्पन्नात वाढ होईल अशा भविष्यातील घटनांवर अवलंबून राहू नये, त्याऐवजी एक मोठे लोन निवडण्यापूर्वी आपली सध्याची आर्थिक स्थिती विचारात घ्या.
सध्याची स्थिती पाहता, नेहमी सल्ला दिला जातो की, लोनसाठी अर्ज करणे किंवा महागड्या संपत्तीची निवड करण्यापूर्वी आपले खर्च समजून घ्या.

 

कोणतेही विमा कव्हर न घेणे

होम लोन घेणार्‍यांनी आपल्या कुटुंबाला फायन्शियल क्रायसिसपासून वाचवण्यासाठी योग्य विमा कव्हर घेतले पाहिजे.
कोणत्याही आकस्मित प्रकरणात, होम लोन विमा कुटुंबाला देणे रक्कम भरण्यासाठी मदत करू शकतो.
अनेक विमा उत्पादने होम लोन कव्हर करतात. एका रक्कमेसाठी जीवन विमा घ्या ज्यामध्ये तुमच्या जबाबदार्‍यांचा समावेश असेल.
आपल्या जबाबदार्‍या सुरक्षित न करणे एक जोखीम आहे जी बहुतांश कर्जदार ओळखत नाहीत.

 

Web Title : Home Loan Tips | 5 mistakes that can lead to rejection of your home loan application

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Court | अ‍ॅट्रोसिटीच्या गुन्ह्यात विश्रांतवाडी-धानोरी परिसरातील एका महिलेसह दोघांना अटकपूर्व जामीन मंजूर

Kolhapur Anti Corruption | लाच घेताना पोलिसासह दोन पंटर अँटी करप्शनच्या जाळ्यात

Mayor Murlidhar Mohol | महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या आईनंही अनुभवलं सेल्फीचं जग; महापौरांची भावनिक प्रतिक्रिया, सेल्फी ‘Viral’