Home Loan Tips | पहिल्यांदा घर खरेदी करणार्‍यांसाठी अतिशय कामाच्या आहेत ‘या’ होम लोन टिप्स, तुम्हीही जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Home Loan Tips | आपले घर बांधणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. परंतु तुम्ही घर खरेदी करण्यासाठी होम लोन (Home Loan Tips) घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. होम लोन खरेदीदाराला आर्थिक किंवा भविष्यातील उत्पन्नाचा लाभ घेणे आणि त्याच्या स्वप्नातील घर खरेदी करण्यासाठी मदत करते. विशेषता जे लोक पहिल्यांदा होम लोन घेणार आहेत त्यांनी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

क्रेडिट स्कोअर तपासणे

उत्कृष्ट क्रेडिट रेटिंगच्या आधारावर चांगल्या व्याजदरावर मोठ्या होम लोनचा लाभ घेऊ शकता. क्रेडिट स्कोअर 800 बेसिक पॉईंटच्यावर चांगला मानला जातो.
यानंतर सर्व कागदपत्र एकत्रित करा.

सर्व आवश्यक कागदपत्र तयार करणे

सर्व कागदपत्र एकत्रित करा. ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, प्राप्तीकर रिटर्न, सॅलरी स्लीप, बँक स्टेटमेंट, कंपनीचे प्रमाणपत्र इत्यादी जमवा.
घेणार असलेल्या संपत्तीसंधीत कागदपत्र जसे की विकणार्‍याची ओळख आणि पत्त्याचा पुरावा, संपत्तीचे टायटल, नकाशा, पूर्ण प्रमाणपत्र इत्यादी तयार ठेवा.

जॉईंट होम लोन

जॉईंट होम लोन घेण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे कर्जपात्रता वाढते. गृहकर्ज परतफेडीवर कर कपातीचा दावा करता येतो.
महिला जर सहअर्जदार असेल तर काही बँका महिलांना कमी व्याजदराने कर्ज देतात, शिवाय कर्ज फेडण्याची जबाबदारी दोन्ही व्यक्तींवर येते.

 

सर्व कागदपत्र लक्षपूर्व वाचा

कर्ज देणार्‍या संस्था कर्ज देण्यापूर्वी असंख्य कागदांवर सही करून घेतात. हे कागद वाचणे अवघड असले तरी वेळ काढून ते वाचून घ्या.
यातील काही अटी तुमच्याविरूद्ध असू शकतात.

व्याजदर लक्षात ठेवा

कमीत कमी व्याजदर असलेले कर्ज घेतले तर तुमचे वाचणारे पैसे गृहकर्जात मदत करू शकतात. (Home Loan Tips)

 

Web Title : Home Loan Tips | these home loan tips are very useful for first time home buyers you should also know

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | ‘वास्तूशोध’च्या बिल्डर कुलकर्णी बंधूंवर फसवणूक प्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल

Gold Price Update | सोने खरेदीदारांसाठी खुशखबर ! 27060 रुपयात मिळतेय 1 तोळा, जाणून घ्या 14, 18, 22, 23 आणि 24 कॅरेटचे नवीन दर

Pune Police Raid | पुणे पोलिसांची मोठी कारवाई ! आंतरराष्ट्रीय स्तरावरील 2 बडे क्रिकेट बुकी ताब्यात, 1 कोटी जप्त