Home Remedies Kidney Stones | ‘या’ 8 घरगुती उपयांनी किडनी स्टोन सहज पडतील शरीरा बाहेर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Home Remedies Kidney Stones | किडनी स्टोन (Kidney Stones) किंवा मुतखडा ही एक खूप त्रासदायक समस्या आहे. भारतात दर 10 माणसांपैकी एकाला मुतखड्याचा त्रास होतो. वैद्यकीय भाषेत याला नेफ्रोलिथियासिस (Nephrolithiasis) किंवा यूरोलिथियासिस (Urolithiasis) असे म्हटले जाते. किडनी स्टोन कशामुळे होतो तर खराब आहार, वाढलेले वजन, इतर काही आजार, पूरक आहार आणि औषधांमुळे मुतखडा होतो. किडनी स्टोन तुमच्या मूत्रमार्गाच्या (Urethra) कोणत्याही भागावर परिणाम करु शकतात. (Home Remedies Kidney Stones)

 

अनेकवेळा ज्यावेळी लघवी घट्ट होते तेव्हा त्याचे दगड तयार होतात. ज्यामुळे मिनरल्स क्रिस्टल (Minerals Crystal) बनून ते एकमेकांना चिकटतात. किडनी स्टोन हे खनिजे आणि क्षारांनी बनलेले कठीण पदार्थ असून ही एक वेदनादायक समस्या आहे. किडनी स्टोन असलेल्या रुग्णांना वेदनाशामक औषध आणि भरपूर पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. काहीवेळा गुंतागुंत झाल्याने शस्त्रक्रिया देखील करावी लागते.

 

किडनी स्टोनची लक्षणे (Symptoms of Kidney Stone)
किडनी स्टोनच्या लक्षणामध्ये बरगड्यांच्या खाली, बाजूला आणी पाठीत तीव्र वेदना होतात. त्या खालीपर्यंत म्हणजे ओटीपोटात आणि कंबरेपर्यंत पसरतात. लघवी करताना जळजळ होणे किंवा वेदना होणे, वारंवार लघवी लागणे, गुलाबी, लाल किंवा ढगाळ तपकिरी रंगाची लघवी होणे, दुर्घंधी येणे, जास्त वेळा लघवी लगाणे किंवा कमी प्रमाणात होणे, संसर्ग झाल्यास उलटी, ताप, थंडी वाजणे ही किडनी स्टोनची लक्षणे आहेत. औषधाशिवाय किडनी स्टोनसाठी काही घरगुती उपाय (Homemade) आहेत. या उपायांमुळे किडनी स्टोन सहजपणे शरीरा बाहेर पडेल. जाणून घ्या घरगुती उपचार. (Home Remedies Kidney Stones)

 

1. ओव्याचा रस (Ova Juice)
ओव्याच्या रसामुळे शरीरात जे विषारी पदार्थ (Toxic Substances) असतात ते बाहेर फेकले जातात. जो किडनी स्टोनला देखील हातभार लावतो. हे बऱ्याच काळापासूनचे पारंपारिक औषध आहे. ओव्याचा रस पिल्याने शरीरात साचलेली घाण बाहेर पडण्यास मदत होते. एक किंवा अधिक ओव्याचे कण पाण्यासोबत मिक्समध्ये बारीक करा आणि त्याचा रस दिवसभर प्या.

 

2. तुळशीचा रस (Tulsi Juice)
प्रत्येकाच्या घरात तुळस असते. तुळशीमध्ये अ‍ॅसिटिक अ‍ॅसिड (Acetic Acid) नावाचा पदार्थ असतो, जे किडनी स्टोन तोडण्यास आणि वेदना कमी करण्यास मदत करतात. याशिवाय यामध्ये भरपूर पोषक तत्व असल्याने पारंपारिकपणे पचनाशी आणि सूज येण्याशी निगडी आजारांसाठी तुळशीच्या रसाचा वापर केला जातो. तुळशीच्या रसात अँटिऑक्सिडंट्स (Antioxidants) आणि अँटिइनफ्लमेट्री (Antiinflammatory) घटक असतात. हे किडनीचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतात.

 

 

3. सफरचंदाचा रस किंवा अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर (Apple Juice or Apple Cider Vinegar)
अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगरमध्ये अ‍ॅसिटिक अ‍ॅसिड असते हे किडनी स्टोन विरघळण्यासाठी मदत करते. तसेच किडनी स्टोनमुळे होणाऱ्या वेदना देखील यामुळे कमी होतात. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर किडनी स्टोनची निर्मिती कमी करण्यासाठी प्रभावी आहे. यासाठी 6 ते 8 औंस शुद्ध पाण्यात 2 चमचे अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर मिसळून हे पाणी दिवसभर प्यावे.

 

 

4. लिंबाचा रस (Lemon Juice)
किडनी स्टोनसाठी लिंबाचे पाणी पिणे अत्यंत उपयुक्त आहे. लिंबूमध्ये सायट्रेट अ‍ॅसिड (Citrate Acid) असते, जे एक रासायन असून कॅल्शियम स्टोन तयार करण्यास प्रतिबंध करते. साइट्रेट किडनीतील लहान लहान आकाराचे दगड देखील फोडू शकते. त्यामुळे ते सहजपणे शरीराबाहेर पडू शकतात.

 

 

5. राजमाचा रस
शिजवलेल्या राजमाचा रसाला राजमा शोरबा असेही म्हटले जाते. हा पारंपारिक पदार्थ असून तो भारतात अनेकदा खाल्ला जातो. हे मूत्राचे आणि किडनीचे आजार सुधारण्यासाठी वापरले जाते. एका अभ्यासानुसार राजमाचा रस दगड विरघळण्यास आणि बाहेर काढण्यात मदत करतात. फक्त शिजवलेल्या राजमामधील काही पाणी गाळून ते एका भांड्यात काढून घ्या. हे पाणी दिवसभरात काही ग्लास प्या.

 

6. डाळिंबाचा रस (Pomegranate Juice)
किडनीचे कार्य सुधारण्यासाठी डाळिंबाचा रस अनेक शतकापासून वापरला जातो. डाळिंबाच्या रसामुळे तुमच्या शरीरातील स्टोन्स आणि इतर विषारी पदार्थ बाहेर पडतात.
डाळिंबाचा रस अँटिऑक्सिडंट्स समृद्ध असतो. जो तुमची किडनी निरोगी ठेवण्यास आणि स्टोन्सची निर्मिती होण्यापासून बचाव करु शकतो.
डाळिंबाचा रस तुमच्या लघवीतील अ‍ॅसिडीटी लेव्हल देखील कमी करतो.

 

 

7. सिंहपर्णीच्या मुळाचा रस
सिंहपर्णीच्या मुळाचा रस किडनीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. जे पित्त उत्पादन उत्तेजित करते.
असे मानले जाते की, ते करचा काढून टाकण्यास मदत करते.
लघवीचे उत्पादन वाढवून पचन क्रिया सुधारते. यामध्ये ए, बी, सी आणि डी ही जीवनसत्त्वे आहे.
तसेच पोटॅशियम, लोह आणि झिंक यासारख्या खनिजांचा देखील चांगला स्त्रोत आहे.
एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, पिवळ्या रंगाची फूले येणारी रानटी फुलझाड म्हणजे सिंहपर्णी जे किडनी स्टोन तयार होण्यास प्रतिबंध करतात.

 

 

8. व्हीटग्रासचा रस
व्हीटग्रास हे अनेक तत्वांनी युक्त आणि दिर्घकाळापासून आरोग्य सुधारण्यासाठी वापरले जाते.
व्हीटग्रास लघवीचा प्रवाह वाढवते ज्यामुळे दगड बाहेर पडण्यास मदत होते.
यामध्ये महत्त्वाचे पोष घटक हे किडनी स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. तुम्ही दररोज दोन ते आठ औंस व्हिटग्रासचा रस पिऊ शकता.

 

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

 

Web Title :- Home Remedies Kidney Stones | these 8 homemade juices can easily help to get rid of and flush out kidney stones without any medication

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Punit Balan Group | पहिली ‘बालन करंडक’ अजिंक्यपद १२ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा; आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमी, द क्रिकेटर्स क्लब यांच्यात विजेतेपदासाठी लढत !

 

How To Prevent Ageing | अवलंबा ‘या’ 5 गोष्टी, त्वचेवर दिसणार नाही वयाचा परिणाम

 

YouTube Shorts Earning | ‘युट्यूब’चे ‘हे’ फीचर आहे श्रीमंत बनण्याचा जबरदस्त मार्ग ! घरबसल्या दर महिना करा 7.5 लाखापर्यंत कमाई, येथे जाणून घ्या कसे