Pune News : पुणे शहरात घरांच्या विक्रीत तब्बल 54 टक्क्यांनी वाढ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – घरांच्या विक्रीत ( home sales) मुद्रांक शुल्कात घट झाली आहे. चौथ्या तिमाहीत (ऑक्‍टोबर ते डिसेंबर) शहरातील घरांची विक्री वार्षिक पातळीवर ५४ टक्‍क्‍यांनी वादळी आणि ती ११ हजार ९५२ युनिट्‌सवर गेली आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्राला गेल्या वर्षातील शेवटचे तीन महिने काहीसे दिलासा देणारे ठरल्याचे स्पष्ट होते. अर्धवार्षिक अहवालाच्या १४ व्या आवृत्तीचे (इंडिया रिअल इस्टेट- एच२ २०२०) अनावरण ‘नाइट फ्रॅंक इंडिया’ने बुधवारी केले आहे. त्यात जुलै ते डिसेंबर या कालावधीत आठ मोठ्या शहरांमध्ये निवासी आणि कार्यालयीन बाजारपेठांच्या निर्मिती व विक्रीचे विश्‍लेषण करण्यात आले आहे.

खराडी, फुरसुंगी, वानवडी आणि कल्याणीनगर, येरवडा, नगररोड, हडपसर या भागांमध्ये वार्षिक पातळीवर ३७५ टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. राज्य सरकारने सप्टेंबरपासून सात महिन्यांसाठी मुद्रांक शुल्क दरात घट जाहीर केल्यामुळे त्याचा अपेक्षित परिणाम झाला असल्याचे या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, दुसऱ्या सहामाहीत शहरातील १७ लाख चौरस फूट जागा कार्यालयीन भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे. नवीन कार्यालयीन जागा पूर्ण होण्याची प्रक्रिया याच कालावधीत पाच लाख चौरस फूट आहे.

शहरातील बांधकाम क्षेत्रातील स्थिती
– मजुरांच्या कमतरतेमुळे कार्यालये पूर्ण होण्याच्या प्रक्रियेवर परिणाम
– को-वर्किंग स्पेसची मागणी वाढली
– सरासरी भाडे वार्षिक पातळीवर ५.५ टक्‍क्‍यांनी कमी झाले
– घरांची विक्री नऊ टक्‍क्‍यांनी वाढली आहे
– नवीन प्रकल्पांत घरांचे सरासरी आकारमान शहर वगळता सर्व लघु बाजारपेठांमध्ये वाढले

गेल्या वर्षीच्या दुसऱ्या सहामाहीत आयटी क्षेत्रातून एकूण मागणी ही गेल्या महिन्यापासून कार्यालय मनुष्यबळाच्या क्षमतेवर असलेल्या मर्यादेमुळे कमी झाली होती. ऑक्‍टोबर ते डिसेंबर या काळात चांगली सुधारली आहे.
– परमवीरसिंग पॉल, शाखा संचालक, नाइ पुण्यातील बांधकाम व्यवसायाची स्थितीट फ्रॅंक इंडिया, पुणे