रक्तदानाची शंभरी गाठलेल्या दत्ता सागरे यांचा सन्मान

पुणे : पोलीसनामा आॅनलाइन – राष्ट्रीय रक्तदान दिनाच्या निमित्ताने ससून रुग्णालय रक्तपेढीच्या वतीने पुणे महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते दत्ता सागरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. ससून चे प्रभारी अधिष्ठाता डॉ.तांबे यांच्याहस्ते सागरे आणि सदाशिव कुंदेन यांना सन्मानित करण्यात आले.

व्हिडिओ गेम नंतर आता नेटफ्लिक्स अ‍ॅप्सचे अ‍ॅडिक्शन  

शंभराहून अधिक वेळा नियमित रक्तदान आणि रक्तदान शिबिरांचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल हा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी वैद्यकीय अधिक्षक डॉ.अजय तावरे, विभाग प्रमुख डॉ.लिना नखाते, ताराचंद करमचंदानी, मीरा दमामे, ससून रक्तपेढीच्या प्रमुख नलिनी काडगी, वैद्यकीय अधिक्षक एम.बी.शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात

प्रत्येक तरुणाने प्रकृती निकोप ठेवून नियमित रक्तदान करावे आणि रक्तदान चळवळीला हातभार लावावा. रक्ताच्या मागणीची निकड लक्षात घेवून रक्तदान करायला हवे असे आवाहन यावेळी बोलताना दत्ता सागरे यांनी केले.

जाहिरात