लासलगाव शहर विकास आघाडीकडून भुजबळ यांना सन्मानपत्र देऊन गौरव

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – २४ ऑक्टोबर रोजी गावाच्या मुलभुत समस्ये बाबत लासलगाव शहर विकास आघाडी तर्फे पुस्तिका दिली होती. त्या पुस्तिकेची विशेष दखल घेऊन भुजबळ यांनी तात्काळ समस्येचे निराकरण केले. यावेळी लासलगाव शहर विकास आघाडीकडून ना. छगनराव भुजबळ यांना सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

अनेक दिवसांच्या मुलभुत समस्या सुटल्यामुळे नागरीकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. लासलगाव शहर हे भुजबळ यांनी दत्तक घेतले असल्या कारणाने शासनाचे कोट्यवधीचे विकास लासलगांव शहरात सुरू असल्याने विकास पुरूष ना. छगनराव भुजबळ साहेबांचा विकास समितीच्यावतीने सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

या प्रसंगी जि.प. अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, शहर विकास समितीचे प्रकाश पाटील, विकास कोल्हे, धर्मेश जाधव, मुन्नाभाई पठाण, राजाभाऊ जाधव, उत्तमराव वाघ, मंदार खानापुरकर, महेश बकरे, बबन तात्या होळकर, महेश मोरे, राहुल खैरनार, अफजल शेख, समिर पठाण, गणेश इंगळे,मगन काळे, वसंत पगारे, प्रतिक वाघचौरे, मनोज होळकर, राजु कुंदे, फकिरा गांगुर्डे, सागर धुमाळ, दिपक जोशी, सुरेश कुमावत, सचिव वाघ, निशांत केंगे, रुपेश भांगडीया, कैलास कांदळ यासह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.