14 फेब्रुवारी राशीफळ : मकर

पोलीसनामा ऑनलाईन टीम – मकर : आजचा दिवस कामाबाबत खुपच महत्वपूर्ण आहे. कामाकडे पूर्ण लक्ष द्याल, यामुळे चांगले काम कराल. वरिष्ठांकडून काही कठोर शब्द ऐकावे लागतील. परंतु, मनाला लावून घेऊ नका, काम व्यवस्थित करा. कुटुंबातील वातावरण शांत राहिल. वैवाहिक जीवनात आज चांगले परिणाम दिसून येतील परंतु, काही खर्‍या गोष्टींमुळे जोडीदाराशी वाद होतील. विरोधकांना घाबरण्याची गरज नाही. ते तुमचं काहीच वाईट करू शकणार नाहीत. प्रेमसंबंधासाठी आजचा दिवस चांगला आहे.