17 फेब्रुवारी राशिफळ : मीन

पोलीसनामा ऑनलाईन टीम – मीन : आजच्या दिवशी एकसोबत अनेक लाभ होऊ शकतात. यामुळे आनंद दुप्पट होईल. भाग्याची साथ मिळेल आणि यामुळे कामात यश मिळेल, आनंद वाढेल. वैवाहिक जीवनात सुखाचे क्षण येतील आणि जोडीदारासोबत एखाद्या पार्टीत जाऊ शकता. जवळच्या मित्रांची भेट होऊ शकते. प्रेमसंबंधात दिवस चांगला आहे. प्रिय व्यक्तीला मनातील गोष्ट बोलून दाखवाल. कुटुंबातील ज्येष्ठांचे आरोग्य बिघडण्याचे संकेत आहेत. तुमचे आरोग्य चांगले राहिल आणि नवीन उर्जेची अनुभूती मिळेल. कामासाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यापारातही यश मिळू शकते.