17 फेब्रुवारी राशिफळ : कन्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम – कन्या : आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र परिणामाचा असेल. प्रेमसंबंधात चढ-उतार राहिल. जोडीदार आपली चूक मान्य करेल आणि यामुळे संबंध सुधारतील. विवाहितांना चांगले परिणाम मिळतील. जोडीदार आपल्या जबाबदार्‍या चांगल्या प्रकारे पार पाडेल. वैवाहिक संबंध मजबूत होतील. कामात आज तुम्ही कमजोर पडू शकता. हे काम आपल्यासाठी चांगले नाही, असे वाटल्याने नोकरी बदलण्याचा विचार करू शकता. प्रवासासाठी दिवस कमकुवत आहे. व्यवसायात चांगला लाभ होऊ शकतो.