21 फेब्रुवारी राशिफळ : मेष

पोलीसनामा ऑनलाईन टीम : मेष –आजचा दिवस खुप वेळानंतर चांगला जाईल. भाग्याची साथ मिळेल आणि एखाद्या विशेष कामात आईकडून मदत मिळेल, ज्यामुळे मोठा लाभ होऊ शकतो. यामुळे आनंद वाढेल. प्रवासाचा योग असला तरी प्रवासात काही त्रास होऊ शकतो. तरीसुद्धा या प्रवासामुळे लाभ होऊ शकतो. प्रेमसंबंधात आनंद राहिल आणि दाम्पत्य जीवनात चांगले परिणाम दिसून येतील. कामात स्थलांतर होऊ शकते. आरोग्य सामान्य राहिल.