21 फेब्रुवारी राशिफळ : कर्क

पोलीसनामा ऑनलाईन टीम : कर्क – आजचा दिवस तुमच्यााठी अधिक अनुकूल नाही. कारण आज तुमचे आरोग्य बिघडू शकते. खर्चसुद्धा वाढू शकतो. काही खर्च अचानक समोर येतील. दूरच्या प्रवासाचा योग आहे. परंतु, यामुळे खर्च वाढू शकतो. दाम्पत्य जीवनासाठी आजचा दिवस चांगला आहे. जोडीदाराचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा, आणि बसून चर्चा करा. तुम्हाला सुख मिळेल आणि कुटुंबातील लोकांचे सहकार्य मिळेल. परंतु, एखाद्या गोष्टीवरून तुम्ही घरच्यांवर नाराज होऊ शकता. कामात चांगले परिणाम दिसून येतील.