21 फेब्रुवारी राशिफळ : तुळ

पोलीसनामा ऑनलाईन टीम : तुळ – आज एखाद्या प्रवासाचा योग आहे. परंतु, प्रवासात काही असुविधा होऊ शकते. घरातील छोट्यांचे आरोग्य बिघडू शकते. तोंडातून असे शब्द जातील, ज्यामुळे घरातील वातावरण बिघडू शकते. यासाठी सावध रहा. आई-वडीलांच्या आशीर्वादामुळे कामात यश मिळेल. त्यांचे आरोग्य कमजोर राहिल. प्रेमसंबंधात आनंद अनुभवाल, कारण प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. दाम्पत्य जीवनात तणाव असूनही स्थिती चांगली राहिल. जोडीदार नाते जपण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. कामात स्थिती ठिक राहिल.