29 फेब्रुवारी रशीफळ : मीन

मीन
आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य आहे. काही चढ-उतार जाणवू शकतात. कुटुंबात काही अडचणी येऊ शकतात. यामुळे पैशाकडे तुमचे लक्ष राहिल. तुमचे वागणे आणि बोलणे यावर तुम्ही दुसर्‍यांना आपलेसे करून घ्याल. याचा तुम्हाला फायदा होईल. मान सन्मान वाढेल. धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. कामात स्थिती सामान्य राहिल. दाम्पत्य जीवन सामान्य राहिल. कौटुंबिक जीवनात तुम्हाला तणाव जाणवू शकतो. प्रेमसंबंधात आजचा दिवस अनुकूल आहे.