US मध्ये नशेची ‘महामारी’, घोडयांना ‘बेशुध्द’ करणारे औषध घेताहेत युवक

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले होते. या व्हायरसचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. पण आता याच अमेरिकेत आता नवी ‘महामारी’ आली आहे. याच्या विळख्यात तरुणाई गेली आहे. नशेचे औषध घेणाऱ्या तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अमेरिकेतील रस्त्यांवर तर उघडपणे ही औषधे विकली जात आहेत. त्याला स्ट्रीट ड्रग्ज म्हटले जात आहे. या स्ट्रीट ड्रग्जमध्ये अशा औषधाचा समावेश केला आहे. याचा उपयोग घोड्यांना बेशुद्ध करण्यासाठी केला जातो.

अमेरिकेतील बहुतांश तरूणाई नशेच्या महामारीत आहे. घोड्यांना बेशुद्ध करणारे हे औषध असून, या औषधाने ओपिऑयड ड्रग्जच्या श्रेणीचा एक तृतीयांश हिस्सा खेचून घेतला आहे.अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे केलेल्या एका अभ्यासातून हा मोठा खुलासा उघड झाला आहे. घोड्याला बेशुद्ध करण्यासाठी औषधाचा वापर नशेसाठी केला जातो. या औषधाचे नाव आहे जायलाजिन. हे ओपिऑयड ड्रग्ज नाही. मात्र, त्याचा वापर ओपियम म्हणजे अफीम बनविणाऱ्या ड्रग्जने केला जातो. या नशेच्या जायलाजिनला हेरॉईन किंवा फेंटानिलसह वापर केला जातो. त्यामुळे अमेरिकेत त्याला ट्रांक डोप (Tranq Dope) म्हटले जाते.

ओपिऑयड ड्रग्जच्या महामारी सुरु
अमेरिकेत ओपिऑयड ड्रग्जची महामारी सुरु आहे. जायलाजिनच्या ओव्हरडोसमुळे दगावलेल्यांची माहिती समोर येत नाही. कारण अमेरिकेतील अनेक प्रयोगशाळांमध्ये त्याची तपासणी होत नाही. त्यामुळे मृतांची माहिती मिळत नाही.