होय, ‘या’ देशात फक्त 83 रुपयांत मिळतंय घर; ना कोणतीही अट, ना नियम !

सिसली : वृत्तसंस्था – स्वत:च घर असावं म्हणून अनेक लोकं मोठे परिश्रम घेतात आणि हक्काचं घर साकारतात. त्यासाठी लाखो तर काही लोकं कोट्यवधी रुपये जमा करतात अन् घर खरेदी करतात. पण एक देश असा आहे तेथील सरकारने घर विकायला काढली आहेत तेही भारतातील पेट्रोलच्या दरापेक्षाही कमी किमतीत आहे. होय, म्हणजे 90 रुपयांपेक्षाही कमी किमतीत तुम्हाला हक्काचं घर मिळू शकते. विश्वास बसत नाही ना…पण हे खरं आहे.

इटलीच्या सरकारने ही योजना आणली आहे. त्यानुसार फक्त 83 रुपयांमध्ये तुम्हाला घर खरेदी करता येऊ शकते. हजारो परदेशी नागरिकांनी तिथं घरांची खरेदी केली आहे. मात्र, याचा स्थानिक लोकांकडून विरोध केला जात आहे. स्थानिक प्रशासन त्यांचे घर विकत आहे. ही घरे इटलीच्या सिसली बेटावर आहेत. 14 व्या शतकात वसलेले हे गाव आता शहरी जंगलात बदलले आहे. इथले बहुतांश घरं पडक्या स्थितीत आहेत. त्यामुळेच येथील लोक गाव सोडून शहरांत राहत आहेत. त्यानंतर आता स्थानिक प्रशासनाने ही घरे विकण्याचा निर्णय घेतला आहे.

गावाची लोकसंख्या वाढवणार
सिसली गावातील घरे फक्त 83 रुपयांत विकली जात आहे. त्यामुळे येथील स्थानिक लोकांकडून जोरदार विरोध केला जात आहे. या विरोधावर बोलताना सिसलीच्या महापौरांनी सांगितले, की या गावाची लोकसंख्या वाढवण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे आम्ही फक्त 83 रुपयांत ही घरे विकण्याचा निर्णय घेतला आहे.

हजारो घरांची विक्री
अवघ्या 83 रुपयांत घरे मिळत असल्याने खरेदी करणाऱ्या लोकांची चांगलीच गर्दी होत आहे. आत्तापर्यंत हजारो परदेशी नागरिकांनी घर खरेदी केले आहे. ही घरे विकल्याचे समजल्यानंतर गावकऱ्यांनी मोठा विरोध केला. त्यावर ते म्हणाले, गाव आमचे, घर आमचे तर मग ते विकणारे प्रशासन कोण?, अशा शब्दांत जोरदार विरोध केला जात आहे.