अशा प्रकारे गुंतवणूक करा अन ‘या’ वयात करोडपती व्हा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्याकडे भरमसाठ पैसा असावा, शिवाय आपण श्रीमंत व्हावं असं प्रत्येकालाच वाटतं. परंतु प्रत्येकाचं हे स्वप्न पूर्ण होतंच असं नाही. कारण काही जण फक्त तसं स्वप्नच बाळगतात तर काह जण त्यासाठी तसे प्रयत्नही करतात आणि त्यांना यशही मिळते. जर तुम्ही नोकरी करत असाल आणि तुम्हालाही वाटत असेल की, श्रीमंत व्हायचं आहे तर नक्की वाचा. कारण आपण काही गुंतवणूक प्लॅन जाणून घेणार आहोत. जे तुम्हाला तुमच्या रिटायर्मेंटपर्यंत 2 कोटींपर्यंत पैसे मिळवून देऊ शकतील. यामध्ये तुमचे वय 25 असो किंवा 35 तरीही ही गोष्ट शक्य आहे. चला जाणून घेऊयात कसे ते?
मुख्य म्हणजे असा फायदा मिळवण्यासाठी तुम्हाला सिस्टमेटिक इन्व्हेस्टमेंट प्लान (एसआयपी)च्या माध्यमातून गुंतवणूक करावी लागणार आहे. एसआयपीच्या माध्यमातूनच म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली जाते. तज्ज्ञांच्या मते, अशा गुंतवणुकीवर 10 टक्के व्याज मिळते. महत्त्वाचे म्हणजे यात गुंतवणुकीची जोखीम कमी होऊन चांगला परतावा मिळू शकतो.
जर तुम्ही 25 वर्षांचे आहात आणि निवृत्तीच्या वयात तुम्हाला 2 कोटी रुपये जमावयाचे असल्यास दर महिन्याला तुम्ही 5 हजार रुपयांची गुंतवणूक करणं गरजेचं आहे. जर या गुंतवणुकीवर तुम्हाला 10 टक्के व्याज मिळाले, तर तुम्ही निवृत्तीच्या वयातच करोडपती होऊ शकता.
अशी करा गुंतवणूक 
वय वर्षं 25
महिन्याची गुंतवणूक 5 हजार
गुंतवणुकीवरच्या रकमेचा व्याजदर 10 टक्के
निवृत्तीचं वय 60 वर्षं
गुंतवणुकीची रक्कम 21 लाख
व्याजानंतरची झालेली रक्कम  1.70 कोटी रुपये
एकूण मिळणारी रक्कम 1.91 कोटी रुपये
जर तुमचं वय 30 वर्षं आहे आणि निवृत्तीच्या वयात 1.5 कोटी रुपये जमा करायचे असल्यास तुम्हाला 8 हजार प्रतिमाह गुंतवणूक करावी लागणार आहे. जर तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर 10 टक्के व्याज मिळाल्यास निवृत्तीपर्यंत 2 कोटी रुपये जमा होतात.
अशी करा गुंतवणूक 
वय वर्षं 30
महिन्याची गुंतवणूक 8 हजार
गुंतवणुकीवरच्या रकमेचा व्याजदर 10 टक्के
निवृत्तीचं वय 60 वर्षं
गुंतवणुकीची रक्कम 28.80 लाख
व्याजानंतरची झालेली रक्कम  1.53 कोटी रुपये
एकूण मिळणारी रक्कम 1.82 कोटी रुपये
35व्या वर्षांत करावं लागणार हे काम
वय वर्षं 35
प्रतिमहिना गुंतवणूक 14 हजार
गुंतवणुकीवरच्या रकमेचा व्याजदर 10 टक्के
निवृत्तीचं वय 60 वर्षं
गुंतवणुकीची रक्कम 42 लाख
व्याजानंतरची झालेली रक्कम  1.45 कोटी रुपये
एकूण मिळणारी रक्कम 1.87 कोटी रुपये
सिस्टमेटिक इन्व्हेस्टमेंट प्लान (एसआयपी)च्या माध्यमातून गुंतवणुकीवर चांगला फायदा मिळतो. प्रत्येक महिन्याच्या पगारातील काही रक्कम बाजूला केल्यास बजेटवर फार काही फरक पडत नाही. या गुंतवणूक केलेल्या पैशावर तुम्हाला चक्रव्याढ व्याजानं परतावा मिळतो.
Loading...
You might also like