Paytm App ची जबरदस्त ऑफर ! ग्राहकाला मिळणार 100 रुपये स्वस्त दराने गॅस सिलिंडर, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वारंवार वाढ होत असतानाच, आता ग्राहकांसाठी पेटीएमने (Paytm App) एक चांगली ऑफर आणली आहे. या ऑफरवरून ग्राहकांना १०० रुपये स्वस्त दराने गॅस सिलिंडर मिळणार आहे. तर Paytm App द्वारे पहिले गॅस सिलेंडर बुक केल्यानतंर ग्राहकाला एक स्क्रॅच कार्ड मिळून त्यात १०० रुपये परत मिळणार आहे.

दरम्यान, एलपीजी सिलिंडर सतत वाढत्या किंमतींमुळे चर्चेत आहेत. १४ किलो गॅस सिलिंडरसोबत ग्राहकाला विविध प्रकारच्या सुविधा मिळून, या प्रत्येक सिलेंडरवर ग्राहकांच्या कुटूंबाला विमा दिला जातो. तसेच देशातील प्रत्येक घरात एलपीजी कनेक्शन मिळावे यासाठी आगामी २ वर्षांमध्ये केंद्र सरकार कमी कागद्पत्रमध्ये देशातील लोकांना १ कोटी मोफत एलपीजी कनेक्शन देणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेली सर्व तयारीही केली जात आहे. याबाबत माहिती तरुण कपूर यांनी दिली होती.

तसेच, Paytm App ने काढलेल्या ऑफरद्वारे ग्राहकाला ऑफरचा लाभ कसा घायचा आणि त्याच्या अटी काय आहेत ते जाणून घ्या..

असा घ्या ऑफरचा लाभ –
> प्रथम Paytm App डाऊनलोड करून लॉगिन करा.

> बुक गॅस सिलेंडर या पर्यायावर क्लिक करा.

> भारत गॅस, एचपी गॅस आणि इंडेन गॅसमधील तुमच्या गॅसचा पर्याय निवडा

> रजिस्टर मोबाईल क्रमांकावर LPG ID भरा.

> यानंतर तुम्हाला पेमेंट पर्याय दिला जाईल.

> सर्व माहिती भरल्यानंतर खाली देण्यात आलेल्या ऑफरमध्ये १०० रुपये कॅप्शन असलेला पर्याय निवडा.

> यानंतर ग्राहकांना योग्य कॅशबॅक दिला जाईलं.

काय आहेत याच्या अटी ?
> पहिल्यांदा सिलिंडर बुक करणाऱ्यांनाच ही ऑफर आहे. Paytm App वरून पूर्वी बुक केला असेल तर त्याचा लाभ मिळणार नाही.

> ग्राहकाला यासाठी कमीत कमी ५०० रुपये भरावे लागणार आहे.

> ३१ मार्च २०२१ पर्यंत ही ऑफर आहे.

> सिलिंडर बूक केल्यानंतर २४ तासांच्या आतमध्ये स्क्रॅच कार्ड मिळणार.

> स्क्रॅच कार्ड मिळालेल्या रकमेनुसार ग्राहकाला फायदा होणार आहे.