रोगप्रतिकारकशक्ती कमजोर असण्याची ‘ही’ 7 आहेत लक्षणं, का होते कमी जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन – कोरोना काळात रोगप्रतिकारकशक्ती चांगली असणे आवश्यक ठरत आहे. कारण रोगप्रतिकारकशक्ती कमी किंवा कमकुवत असल्यास कोरोना विषाणू आणि इतर आजारांपासून बचाव करणं कठीण होऊ शकतं. रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी लोक विविध उपाय करत आहेत. मात्र, रोगप्रतिकारकशक्ती कमजोर आहे हे कसे ओळखावे, आणि ती का कमी होते, ते जाणून घेवूयात.

ही आहेत लक्षणं

1 कँडीडा टेस्ट पॉजिटिव्ह येणे
2 यूटीआईच्या समस्या उद्भवणे
3 अतिसारची समस्या होणे
4 हिरड्यांना सुज येणं
5 एलर्जीची समस्या होणे
6 सर्दी, खोकला
7 ताप येणे

हे लक्षात ठेवा

थकवा, सतत आळस येणं, जखम बरी व्हायला वेळ लागणं, जास्त झोप येणं, नैराश्य येणं, डोळ्यांखाली काळी वर्तुळ दिसणं, ही लक्षणं सुद्धा रोगप्रतिकारकशक्ती कमजोर असल्याची आहेत.

शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे पॅथोजन्स असतात. खाताना, पिताना किंवा श्वास घेताना आपण हानीकारक तत्व शरीरात घेत असतो. त्यामुळे आपण आजारी पडतो.

टॉक्सिन्स बक्टीरिया, वायरस, फंगस, पॅरासाइट तसंच दुसरे नुकसानकारक पदार्थ असू शकतात. रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत असल्यास हेपेटाइटिस, लंग्स इनफेक्शन यांसारखे आजार होण्याची शक्यता असते.

व्हिटामीन डी ची कमतरता असल्याने रोगप्रतिकारकशक्ती कमी होऊ शकते. याशिवाय वातावरणातील बदलांमुळे शरीरात अनेक बदल होत असतात.