Driving लायसन्स Aadhaar Card ला कसे जोडाल? जाणून घ्या प्रक्रिया

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  आधार कार्ड (Aadhaar Card) व्यक्तीकडे असणारा एक महत्वाचा दस्तऐवज आहे. अनेक कामात आधार कार्डाची आवश्यकता असते. भारतात रहात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आधार कार्ड बनविणे गरजेचे केले आहे. तर आधार कार्ड हे पॅन कार्डला (pan card) लिंक करण्याची अंतिम तारीख आता ३१ मार्च करण्यात आली आहे. याचबरोबरच आता आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसनलाही (Driving License) करण्यास सांगण्यात आले आहे.

तर आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसनला जोडण्याचा एकदम सोपा मार्ग आहे. शासनाने बनावट लायसनला आळा घालण्यासाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मात्र सध्यातरी सरकारकडून याबाबत अधिकृत आदेश आलेला नाही. परंतु सुरक्षेचा विचार करता व्यक्तीने आधार ड्रायव्हिंग लायसनला लिंक करणे महत्वाचे आहे. तर आधारला ड्रायव्हिंग लायसन लिंक करण्याची पद्धत जाणून घ्या.

अशी आहे प्रक्रिया :

ड्रायव्हिंग लायसन (Driving License) आधारला जोडण्यासाठी सर्वात अगोदर sarathi.parivahan.gov या सरकारी वेबसाईटवर जावे लागणार आहे. यानंतर व्यक्तीच्या राज्याचे म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन ज्या राज्याचे आहे त्या राज्याची निवड करणे. यानंतर नवीन विंडो खुली होऊन, नव्या विंडोच्या उजव्या बाजुला (right side) मेनूबारमध्ये अप्लाय ऑनलाईनवर क्लिक करणे आहे. यानंतर ऑन ड्रायव्हिंग लायसन (Renewal / Duplicate / Aedl / Others) क्लिक करावे.

हे केल्यावर आता दुसरी विंडो खुली होऊन, यामध्ये पुन्हा राज्याची निवड करावी. यानंतर कंटीन्यूवर क्लिक करावे. यामध्ये आधार कार्डची (Aadhaar Card) माहिती भरावी. अखेर प्रोसिडवर क्लिक करून पुढे ड्रायव्हिंग लायसनची (Driving License) माहिती भरावी. तिथे मोबाईल क्रमांक आणि आधार कार्डचा पर्याय दिसेल. नंतर येथे आधार नंबर आणि OTP टाकावा लागणार आहे. यानंतर लायसन्स अपडेट होणार आहे.