MP : मजुरी करणारा सुनील डावर देशाचा प्रतिभावान ‘धावपटू’ कसा बनला, जाणून घ्या

ADV

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अ‍ॅथलेटिक्समध्ये सात सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्यपदक सहित 10 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पदके आपल्या झोळीत टाकणारा मध्य प्रदेशचा सुनील डावर एकेकाळी दोन वेळची भाकर मिळावी म्हणून शेतात मजुरी करायचा. नुकत्याच भोपाळ येथे झालेल्या 18 व्या राष्ट्रीय ज्युनिअर फेडरेशन कप अंडर -20 मध्ये 2015 चा विक्रम मोडत त्याने या स्पर्धेत नवीन विक्रम स्थापित केला आहे. एका छोट्या खेड्यातून राष्ट्रीय चॅम्पियन होण्यासाठी बाहेर पडण्याची सुनीलची ही कहाणी पूर्णपणे फिल्मी आहे, पण वास्तव आहे. पालक, भावंडे अजूनही जीवन जगण्यासाठी मजुरी करत आहेत.

सुनीलने वयाच्या 12 व्या वर्षांपासून मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील टांडा बरड गावात मजुरी करण्यास सुरुवात केली होती. तीन वर्ष काम केल्यानंतर नशीब बदलले. एकदा शाळेच्या शिक्षिका प्रीती यांनी त्यास धावायला सांगितले. त्यात त्याने चांगली कामगिरी केली म्हणून जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर खेळण्याची त्याला संधी मिळाली. 2017 मध्ये, शालेय क्रॉस कंट्री रेस (पाच किमी धावणे) साठी निवड झाली आणि तेथे सुवर्णपदक जिंकले. तेव्हापासून तो मध्यप्रदेश अ‍ॅथलेटिक्स अकादमीचे प्रशिक्षक एस.के. प्रसाद यांच्या देखरेखीखाली आपले कौशल्य विकसित करत आहे.

ADV

सुनीलने भोपाळमध्ये ताकद दाखविली
भोपाळ येथे जानेवारीत झालेल्या तीन दिवसीय चॅम्पियनशिपमध्ये सुनीलने दोन सुवर्ण पदके जिंकली. 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुनीलने तीन मिनिटे 48.54 सेकंदाच्या वेळेसह सुवर्णपदक जिंकले. सुनीलने याच स्पर्धेत 2015 ला हैदराबादमध्ये शशिभूषणद्वारे स्थापित तीन मिनिटे 51.16 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम मोडला. सुनीलने पाच हजार मीटर शर्यतीत दुसरे सुवर्णपदक देखील जिंकले.

आशियाई चँपियनशिपची तयारी
सुनील म्हणाला, “ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पदक जिंकण्याचे माझे लक्ष्य आहे. सध्या मी 2022 मध्ये होणाऱ्या आशियाई चँपियनशिपची तयारी करत आहे. 6-10 फेब्रुवारी रोजी गुवाहाटी येथे होणारी ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिप देखील खेळेल.” प्रशिक्षक एस. के. प्रसाद यांच्या मते सुनीलमध्ये क्षमता आहे. जर तो या आवेशाने खेळत राहिला तर तो देशासाठी ऑलिम्पिकमध्ये खेळू शकतो.

ऑलिम्पिकमध्ये दाखवू शकतो जलवा
ऑलिम्पियन अंकित शर्मा म्हणतात, “सुनील मप्र अ‍ॅकॅडमीचा प्रतिभाशाली खेळाडू आहे. तो ज्या पद्धतीने कष्ट करत आहे, त्यानुसार ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास फारसा कठीण नाही. सुनीलची कामगिरी पाहता तो 2024 च्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघात सहभागी होऊ शकेल असे दिसते. सुनीलमध्ये भरपूर क्षमता आहे.”

उपलब्धी –
– 2018 मध्ये 15वी नॅशनल यूथ अंडर
– 18 मध्ये तीन किमी प्रकारात सुवर्णपदक
– 2019 मध्ये खेलो इंडिया अंडर
– 21 मध्ये 1500 मीटरमध्ये कांस्य
– 2019 मध्ये 35वी नॅशनल ज्युनियर अ‍ॅथलेटिक्स चँपियनशिपमध्ये दोन सुवर्णपदक
– 2019 मध्ये 64व्या नॅशनल स्कूल गेम्समध्ये तीन किमीमध्ये सुवर्णपदक
– 2019 मध्ये 13व्या साऊथ एशियन गेम्स, काठमांडूमध्ये पाच किमीमध्ये रौप्यपदक
– 2020 मध्ये खेलो इंडिया अंडर-21 चॅम्पियनशिप
– गुवाहाटीमध्ये 1500 मीटर मध्ये सुवर्णपदक आणि पाच किमी मध्ये रौप्यपदक
– जानेवारी 2021 मध्ये 18वा राष्ट्रीय ज्युनियर फेडरेशन चषक
– अंडर-20 मध्ये 1500 मीटर आणि पाच किमी श्रेणीत सुवर्णपदक