मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – भारतीय पोस्ट खात्याने कात टाकण्यास सुरुवात केली आहे. बँकिंग क्षेत्रात पदार्पण करत इतर बँकाप्रमाणे ही बँकदेखील आपल्या ग्राहकांना सर्व आधुनिक सेवा सुविधा प्रदान करते. त्यामध्ये आता इंटरनेट बँकिगचाही समावेश केला आहे. यामुळे आता वेळेची बचत होणार आहे.
पोस्टातील राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC), किसान विकास पत्र (KVF), पीपीएफ (PPF) आदी बचत योजनांवर अधिक व्याज मिळत असल्यानं आणि सुरक्षितता अधिक असल्यानं मोठ्या संख्येनं नागरिक आपल्या ठेवी पोस्टात ठेवतात. पोस्टातील ठेवी किंवा रक्कम पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँकेतील (POSB) खात्यात ट्रान्स्फर करायची असेल तर आता इंटरनेट बँकिंगची सेवा उपलब्ध आहे. पोस्टमधील बचत खात्यासाठी इंटरनेट बँकिंग सुविधा सुरू करायची असेल तर, काही गोष्टी जाणून घेणं आवश्यक आहे. मुख्य म्हणजे तुमचं पोस्ट बँकेतील खाते सुरू असले पाहिजे. तुमचा चालू मोबाईल क्रमांक आणि इमेल आयडीही आवश्यक आहे. पॅनकार्ड क्रमांकही हवा. केवायसीसाठी आवश्यक कागदपत्रही जवळ असल्याची खात्री करून घ्या.
https://www.indiapost.gov.in/VAS/Pages/Form.aspx. या इंडियन पोस्टच्या वेबसाईटवरून पोस्ट ऑफिस इंटरनेट बँकिंगचा फॉर्म डाऊनलोड करून घ्या. फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट आऊट काढून तो फॉर्म घेऊन तुमचं खातं असलेल्या पोस्टाच्या शाखेत जा. तिथं तो अर्ज आणि आवश्यक कागदपत्रं जमा करा.
तुमच्या खात्यासाठी इंटरनेट बँकिंग सेवा कार्यान्वित केल्याचा तुम्हाला एक एसएमएस येईल. तो आल्यानंतर https://ebanking.indiapost.gov.in या लिंकवर जाऊन ‘न्यू युजर ऍक्टिव्हेशन या पर्यायावर क्लिक करा. इथं तुम्हाला कस्टमर आयडी जो तुमच्या पासबुकच्या पहिल्या पानावर छापलेला असतो. तो टाका. अकाउंट आयडी हा तुमच्या बचत खात्याचा क्रमांक असतो. काळजीपूर्वक पासवर्ड भरणं आवश्यक आहे. पाचवेळा चुकीचा पासवर्ड भरल्यास युजर आयडी चालत नाही. तो पुन्हा सुरू करण्यासाठी [email protected] या वेबसाईटवर रजिस्टर्ड ई-मेल आयडीवरून कस्टमर आयडी, युजर आयडी अशी सर्व माहिती पाठवून अर्ज करावा लागतो. त्यानंतर तुमच्या खात्याचे इंटरनेट बँकिंग सुरू होते. एकूणच या इंटरनेट बँकिंगमुळे आता घर बसल्याच पैसे पाठवता येणार आहे. त्यामुळे पोस्टात जाणायची गरज नसून वेळेचीही बचत होणार आहे.