Video : कोरोना काळात किती ‘निरोगी’ अन् ‘मजबूत’ आहेत तुमची फुफ्फुसे? घरबसल्या ‘या’ पध्दतीनं तपासा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक नागरिक बाधित होत आहेत. पण यामध्ये हजारो कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्याचे कारण म्हणजे कोरोना व्हायरसचा फुफ्फुसावरील हल्ला. कोरोना व्हायरस मानवी फुफ्फुसावर थेट हल्ला करतो.

याबाबत तज्ज्ञ डॉक्टरांनी माहिती दिली आहे. कोरोना नवा म्युटंट मोठा धोकादायक दिसत आहे. त्याची सुरुवात गळ्यापासून होते. पण जेव्हा तुमच्याकडे रोगप्रतिकारक शक्ती नसते तर कोरोना व्हायरस थेट तुमच्या फुफ्फुसावर हल्ला करतो. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये 5 ते 6 दिवसांत फुफ्फुसात इन्फेक्शन दिसू लागते. याची माहिती आता तुम्ही घरबसल्या घेऊ शकता.

देशातील टॉप रुग्णालयांपैकी एक असलेल्या जायडस रुग्णालयाने एक टेस्टिंग व्हिडिओ ट्विरवर शेअर केला आहे. त्यामध्ये फास्ट आणि सोपी पद्धत सांगितली आहे.

अशी करा टेस्ट…
जारी केलेल्या व्हिडिओमध्ये 0 ते 10 पर्यंत नंबर देण्यात आले आहेत. ज्यामध्ये 2 नंबर नॉर्मल लंग्ज असेल. 5 नंबर स्ट्राँग लंग्ज म्हटले जाईल. तर 10 नंबर ला सुपर लंग्ज् म्हटले जाईल. व्हिडिओ प्ले केल्यानंतर आपण श्वास रोखा आणि फिरणाऱ्या बॉलकडे लक्ष द्या. लाल बॉल किती वेळा फिरेल तुम्हाला त्यानुसार क्रमांक दिले जाईल. तुम्ही जितक्या वेळ श्वास रोखून धरू शकता तितके मजबूत तुमचे फुफ्फुस असेल.