चालू महिन्यात तुमच्या PF अकाऊंटमध्ये किती पैसे आले? जाणून घेण्यासाठी ‘या’ नंबरवर द्या मिस कॉल, ‘हा’ आहे नंबर
पोलीसनामा ऑनलाइन टीम – आता 1 एप्रिल 2021 पासून आर्थिक वर्ष सुरू झाले आहे, अनेक मोठे बदल झाले आहेत, तुम्ही तुमचा पीएफ बॅलन्स आवश्य चेक करा. यासाठी अनेक पद्धती आहेत. यापैकी एक पद्धत आहे मिस कॉलची. यासाठी ईपीएफओने क्रमांक जारी केला आहे. याशिवाय ऑनलाइन किंवा एसएमएसने सुद्धा पीएफ रक्कम जाणून घेवू शकता.
या नंबरवर मिस्ड कॉलने समजू शकतो बॅलन्स –
तुम्ही तुमच्या पीएफ अकाऊंटचा बॅलन्स एका मिस्ड कॉलने जाणून घेऊ शकता. यासाठी आपल्या अकाऊंटमध्ये रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 011-22901406 वर एक मिस्ड कॉल द्यावा लागेल. ज्यानंतर तुम्हाला ईपीएफओकडून एक एसएमएस येईल. ज्यामध्ये तुम्हाला आपल्या पीएफ अकाऊंटमध्ये जमा रक्कमेची संपूर्ण माहिती मिळेल.
एसएमएसने पीएफ बॅलन्स जाणून घ्या
तुम्ही एसएमएसने सुद्धा आपला पीएफ अकाऊंटचा बॅलन्स सहज जाणून घेवू शकता. यासाठी तुम्हाला तुमचा युएएन माहित असायला हवा. सोबतच तो अॅक्टिव्ह असावा. एसएमएस सर्वप्रथम EPFOHO UAN HIN टाइप करून 7738299899 वर पाठवावा लागेल. ज्यानंतर तुम्हाला हिंदीमध्ये मॅसेज येईल. ज्यामध्ये तुमच्या पीएफ अकाऊंटमध्ये जमा रक्कमेची पूर्ण माहिती असेल.
एसएमएसद्वारे आपण 10 भाषांमध्ये आपल्या पीएफ अकाऊंटची माहिती मिळवू शकता. उदाहरणार्थ जर तुम्हाला मराठीत माहिती हवी असेल तर सर्वप्रथम तुम्हाला EPFOHO UAN MAR टाइप करावे लागेल आणि त्यानंतर 7738299899 वर मॅसेज पाठवावा लागेल. ज्यानंतर तुम्हाला ईपीएफओकडून त्याच भाषेमध्ये एक मॅसेज येईल ज्यामध्ये तुमची सर्व डिटेल्स असेल. तर इंग्रजीत जाणून घेण्यासाठी कोणताही कोड टाइप करावा लागणार नाही.
या भाषांसाठी हे कोड टाइप करा
हिंदी – HIN
पंजाबी – PUN
गुजराती – GUJ
मराठी – MAR
कन्नड – KAN
तेलगु – TEL
तमिळ – TAM
मल्याळम – MAL
बंगाली – BEN
1 एप्रिलपासून पीएफच्या व्याजावर टॅक्सचा बदलला नियम
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे ईपीएफ आणि व्हॉलंटरी प्रॉव्हिडंट फंडमध्ये एखाद्या कर्मचार्याकडून योगदान एखाद्या आर्थिक वर्षात 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त जमा आहे तर 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्तच्या रक्कमेवर मिळणारे व्याज टॅक्सच्या कक्षेत येईल. आता एका आर्थिक वर्षात 2.5 लाखापर्यंत ईपीएफमध्ये गुंतवणूकच टॅक्स फ्री होईल. प्रायव्हेट सेक्टर कर्मचारी 2.5 लाख आणि सरकारी कर्मचारी 5 लाखापर्यंत टॅक्स फ्री गुंतवणूक करू शकतील.