तुमचा CIBIL स्कोअर प्रभावित होऊ न देता क्रेडिट कार्ड कसे बंद करावे, ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

नवी दिल्ली : कोणत्याही आर्थिक आपत्तीच्या स्थितीला तोंड देण्यासाठी क्रेडिट कार्ड एक चांगले बॅकअप टूल होऊ शकते. मात्र, अनेकदा असे होते की, यूजर्स खर्च टाळण्यासाठी ते बंद करणे किंवा रद्द करण्याचा विचार करू शकतो.

क्रेडिट कार्ड बंद करताना, ग्राहकाने हे लक्षात ठेवले पाहिजे की, हे अनेकदा सीबील स्कोअरला प्रभावित करू शकते. कारण क्रेडिट कार्डवरून समजते की, क्रेडिटची रक्कम कुणाचा लाभ घेऊ शकते.

संपूर्ण पेमेंट केल्यानंतर कार्ड बंद करा
क्रेडिट कार्ड यूजर्सकडे जर एकापेक्षा जास्त कार्ड आहेत तर अतिरिक्त कार्ड बंद करावेत, आणि बंद करण्यापूर्वी संपूर्ण बाकी भरावी. सोबतच रिवॉर्ड पॉईंटचा लाभ घेण्यास विसरू नका.

सीबील कायम राखण्यासाठी यूजर्सने आपली उर्वरित रक्कम दुसर्‍या क्रेडिट कार्डमध्ये ट्रान्सफर करावी आणि कमी व्याजदरावर रक्कम भरावी.

पहिल्यांदा नवीन कार्ड बंद करावे
पहिल्यांदा नवीन क्रेडिट कार्ड बंद करा आणि नंतर हळुहळु जुनी कार्ड बंद करा. मोठ्या कालावधीपासून वापरात असलेले कार्ड बंद केल्याने क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो.

कार्ड बंद करतानाची वेळ तपासा
क्रेडिट कार्ड बंद होण्याची वेळ सुद्धा खुप महत्वाची असते. ग्राहकांनी क्रेडिट कार्ड बंद करताना हे सुद्धा लक्षात ठेवले पाहिजे की, त्यांच्याकडे उर्वरित क्रेडिट कार्डवर थकीत रक्कम जास्त तर नाही ना.