तुमच्याकडे सुद्धा आहे गोल्ड ज्वेलरी तर अशाप्रकारे कमवा जास्त पैसा; जाणून घ्या काय करावे लागेल?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अनेकदा असे होते की, अचानक पैशांची गरज भासते आणि त्यावेळी आपली ज्वेलरी (jewellery) खुप उपयोगी येते. अनेक लोक आपत्कालीन रोख रक्कमेची गरज असल्यावर सोन्याचे दागिने विकण्याचा पर्याय निवडतात. सध्या कोरोना Corona महामारीमुळे अशा लोकांची संख्या वाढत आहे. कारण अनेक लोक नोकरी जाणे आणि व्यवसाय Business बंद असल्याने आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. या दरम्यान तुम्ही सुद्धा सोन्याचे दागिने विकण्याचा विचार करत असाल तर कशाप्रकारे तुम्ही चांगली किंमत मिळवू शकता ते आज आम्ही सांगणार आहोत.

योग्य वजन आणि कॅरेट करा चेक
ज्वेलरी (jewellery) विकण्यापूर्वी तिचे योग्य वजन आणि कॅरेट जाणून घ्या.
यासाठी नेहमी ज्वेलरीची रिसिट घेणे चांगले ठरते.
जर तुमच्याकडे रिसिट नसेल किंवा रिसिटवर त्याचा उल्लेख नसेल तर चांगले ठरेल की याचा शोध घ्या.
तुम्ही कॅरेट मीटरवाल्या ज्वेलर्सशी संपर्क करू शकता.
हे जाणून घेण्यासाठी दोन किंवा दोन पेक्षा जास्त ज्वेलर्सकडून तपासून घेणे ठिक राहील.

दागिन्यांचे हॉलमार्किंग पहा
दागिन्यांचे हॉलमार्किंग त्यांची शुद्धता दर्शवतात आणि खरेदीदार नेहमी असे दागिने पसंत करतात.
जर दागिने हॉलमार्कचे असतील तर हॉलमार्क स्टॅम्पवर कॅरेटचा उल्लेख असतो.

योग्य खरेदीदार निवडा
आपली ज्वेलरी (jewellery) तिथेच विकण्याचा प्रयत्न करा जिथून खरेदी केली होती.
काही दुकानांचे धोरण असते की ते केवळ तेच दागिने खरेदी करतील जे त्यांनी विकलेले आहेत.
एका प्रतिष्ठित ब्रँडच्या सोनाराकडे जाणे नेहमी चांगले ठरते.

अनेक ज्वेलर्सशी बोला
अंतिम किंमत ठरवण्यापूर्वी, ज्वलर्स वजनाचा ठराविक टक्का घट म्हणून कमी करू शकतात.
काही सोनार 20 टक्के पर्यंत घट कापतात.
जर दागिन्यांमध्ये खडे असतील, तर जास्त घट धरू शकतात.
मेकिंग चार्जेसच्या प्रकरणात हे पैसे तुम्हाला परत मिळणार  नाहीत, जे ज्वेलरी खरेदी करताना चुकवलेले असतात.

काय सांगतात जाणकार ?
जाणकारांनुसार जर तुम्ही 10,000 रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे दागिने विकत असाल तर सोनार केवळ चेकच्या माध्यमातून पैसे देऊ शकतो. यासाठी, हे पाहून घ्या की सोनार चेकने पैसे देण्यास सक्षम आहे किंवा नाही. सोबतच अशा दुकानांपासून आणि सोने खरेदीदारांपासून सावध रहा जे नेहमी चुकीचा सल्ला देऊन ग्राहकांचा फायदा उचलतात. यासाठी हेच योग्य ठरेल की, तुम्ही एखाद्या प्रतिष्ठित ब्रँडच्या सोनाराकडे जावे.

READ ALSO THIS :

Aurangabad News | औरंगाबादमध्ये वीज कोसळून युवतीचा दुर्देवी मृत्यू, 1 जण गंभीर जखमी

BCCI Big Announcement | इंग्लड दौऱ्यानंतर रंगणार आयपीएलचा थरार; बीसीसीआयने केली मोठी घोषणा

Congress Leader Sachin Pilot : भाजपवासी झालेल्या ‘या’ महिला नेत्याचा मोठा दावा, म्हणाल्या – ‘सचिन पायलट यांच्याशी बोलणं झालंय, ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील’