How To Get Mudra Loan Benefits | एक सरकारी योजना, जिने 40 कोटी लोकांना बनवले बिझनेसमॅन, तुम्हीसुद्धा जाणून घ्या पैसे घेण्याची पद्धत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – How To Get Mudra Loan Benefits | देशात स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेला (Pradhan Mantri Mudra Yojana) भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. एप्रिल २०१५ मध्ये सुरू झालेल्या या योजनेचा ८ वर्षांत ४० कोटींहून जास्त लोकांनी लाभ घेतला आहे. या कालावधीत, सरकारने मुद्रा लोनच्या रूपात २३.२ लाख कोटींची रक्कम वितरित केली आहे. उद्योग सुरू करण्यासाठी किंवा त्याचा विस्तार करण्यासाठी मुद्रा योजनेअंतर्गत ५०,००० ते १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. विशेष म्हणजे मुद्रा लोन (Mudra Loan) घेण्यासाठी कोणतीही हमी द्यावी लागत नाही. (How To Get Mudra Loan Benefits)

 

प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत व्यवसाय सुरू करणाऱ्या लोकांना तीन श्रेणींमध्ये कर्ज दिले जाते. पहिली कॅटेगरी शिशू लोनची आहे. यामध्ये ५०,००० रुपयांचे हमीमुक्त कर्ज दिले जाते. किशोर कॅटेगरीत ५०,००० ते ५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. तसेच तरुण श्रेणीत ५ लाख ते १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरकार देते. केंद्राने जारी केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, आतापर्यंत एकूण ४०.८२ कोटी लोकांना मुद्रा लोन देण्यात आले आहे. शिशू श्रेणीत सर्वाधिक ३३.५४ कोटी कर्ज देण्यात आले आहे. (How To Get Mudra Loan Benefits)

 

कोण घेऊ शकतात मुद्रा लोन
व्यवसाय करणारा कोणीही भारतीय किंवा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असलेला व्यक्ती मुद्रा लोन घेऊ शकतो. २०१५ मध्ये सुरू झालेल्या या योजनेचा उद्देश रस्त्यावरील विक्रेते तसेच छोट्या व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी विना हमी पैसे उपलब्ध करून देणे हा आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कोणतीही बँक, मायक्रोफायनान्स कंपनी किंवा एनबीएफसीच्या मार्फत कर्ज घेता येते.

असे घेऊ शकता मुद्रा लोन
मुद्रा लोन हे बँका आणि एनबीएफसीद्वारे दिले जाते. अर्जदाराच्या सामान्य माहितीशी संबंधित कागदपत्रांव्यतिरिक्त, मुद्रा लोन घेण्यासाठी बिझनेस प्लान तयार करावा लागेल. बँक अर्जदाराकडून प्रोजेक्ट रिपोर्ट, भविष्यातील उत्पन्नाच्या अंदाजांशी संबंधित कागदपत्रे इत्यादी देखील मागू शकते. बँकेच्या शाखेत जाऊन कर्जासाठी अर्ज करू शकता.

 

असा आहे व्याजदर
मुद्रा लोनसाठी एकसमान व्याजदर नाही. प्रत्येक बँक आपापल्या परीने व्याज आकारते. साधारणपणे, कर्जाची रक्कम आणि व्यवसायाच्या स्वरूपावर व्याज ठरते. व्यवसायात अधिक जोखीम असल्यास बँका जास्त दराने कर्ज देतात. सामान्यतः मुद्रा लोन १०-१२% वार्षिक व्याज दराने मिळते.

 

ही कागदपत्रे आवश्यक
२ नवीन पासपोर्ट आकाराचे फोटो.
अर्जदाराचा ओळखीचा पुरावा.
अर्जदाराचे रहिवासी प्रमाणपत्र.
जर अर्जदार एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्याक इत्यादीं असेल तर जातीचे प्रमाणपत्र.
व्यवसायाचे लायसन्स (आवश्यक असल्यास).
व्यावसायासाठी खरेदी करायच्या वस्तूंचा तपशील (जर आवश्यक असेल तर).
बिझनेस प्लान.
प्रोजेक्ट रिपोर्ट (प्रत्येक कर्जासाठी आवश्यक नाही.)
फॉर्म पूर्णपणे भरून आवश्यक कागदपत्रांसह जमा करा.

 

Web Title :- How To Get Mudra Loan Benefits | how to get mudra loan benefits eligibility interest rate documents who can take

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Dsk Vishwa Water Problem – MP Supriya Sule | डीएसके विश्वचा पाणीप्रश्न लवकरच सुटणार

MP Udayanraje Bhosale | ‘…तर मी आव्हानांना भीक घालत नाही’, उदयनराजेंचा अजित पवारांना टोला (व्हिडिओ)

RAJIV Gandhi e -Learning School Pune | राजीव गांधी ई-लर्निंग स्कुलला ‘ISO 9001’ मानांकन