MP Udayanraje Bhosale | ‘…तर मी आव्हानांना भीक घालत नाही’, उदयनराजेंचा अजित पवारांना टोला (व्हिडिओ)

वाई/सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – अजित पवार (Ajit Pawar) यांचे सातारा जिल्ह्यात दौरे वाढलेत कदाचित त्यांना येथूनच निवडणूक लढवावी असं वाटत असेल, अशी खोचक टीका खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी केली आहे. तसेच प्रत्येक नेत्याला पक्ष वाढवण्याची जबाबदारी असते त्यातून ते विधान करतात, त्यात गैर काय. राष्ट्रवादीच (NCP) काय उद्या कम्युनिस्ट पक्षाचे (Communist Party) लोक म्हणतील. तसेच भाजपच्या (BJP) लोकांनाही वाटते की आपला खासदार व्हावा, ही चांगली गोष्ट आहे. पण, त्यातून कोणी आव्हान दिले तर मी आव्हानांना भीक घालत नाही. आव्हान कोणाचे स्वीकारयाचे हे मीच ठरवतो, असा टोला उदयनराजे (MP Udayanraje Bhosale) यांनी अजित पवारांना लगावला.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार रविवारी साताऱ्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी 2024 मध्ये सातारचा खासदार व आमदारही राष्ट्रवादीचा असेल, असे वक्तव्य केले होते. याबाबत उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांना विचारले असता त्यांनी हा चांगला विचार असल्याचे म्हणत अजित पवारांच्या वक्तव्याचे स्वागत केले. मात्र यातून कोणी मला आव्हान देण्याचा प्रयत्न करत असेल तर मी आव्हानाला भीक घालत नसल्याचे त्यांनी सांगितले.

उदयनराजे म्हणाले, समाजकारण असू द्या अथवा राजकारण, प्रत्येकाची महत्वकांक्षा असते. आपण जर व्यापकपणे विचार केला नाही, तर पुढेच जाऊ शकणार नाही. ही तर लोकशाही आहे. प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे. ते काय बोलले असतील. निश्चित चांगले विचार लोकांना दिले असतील. प्रत्येक नेत्यांना आपला पक्ष वाढवण्याची जबाबदारी असते. त्यातून ते अशा प्रकारची वक्तव्ये करत असतात. त्यात काही गैर नाही, असेही उदयनराजे म्हणाले.

उदयनराजे पुढे म्हणाले, काही लोक तंबी देण्याचं काम करत आहेत.
जर तुम्हाला तुमचे हित कळत असेल तर वाकड्या नजरेने बघू नका.
काही लोकांना असं वाटतं की हा भाग हा पिरसर म्हणजे माझा आहे.
मला हसू येते असे म्हणत साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) सुद्धा मनात कधी
आणलं नसले की हे माझं, ते माझं. छत्रपती शिवाजी महाराज नेहमी म्हणायचे समाजामुळे मी आहे,
माझ्यामुळे समाज नाही, असं म्हणत उदयनराजेंनी नाव न घेता आमदार शिवेंद्रराजे (MLA Shivendra Raje Bhosale) यांच्यावर निशाणा साधला.

Web Title :  MP Udayanraje Bhosale | udayanraje bhosle criticism of ajit pawar challenges

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Thane ACB Trap | 1 लाख 42 हजाराची लाच घेताना निवासी नायब तहसीलदाराला अ‍ॅन्टी करप्शननं रंगेहाथ पकडलं

Pune PMC – Pramod Nana Bhangire | महापालिका कर्मचाऱ्यांच्या बदल्या अतिरिक्त आयुक्त यांच्या ऐवजी आयुक्तांच्या नियंत्रणाखाली आणा ! शिवसेना शहर अध्यक्ष नाना भानगिरे यांची मागणी, बदल्या न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Ambadas Danve | काय हा ‘फडतूस’पणा? ‘तो’ फोटो शेअर करत अंबादास दानवेंचे टीकास्त्र

India Monsoon Prediction | यावर्षी पाऊस मुबलक पडणार की नाही? मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर; ‘एल निनो’चा धोका!