गृहकर्जासाठी अर्ज करताय ?; ‘या’ गोष्टी वाचा होईल मोठा फायदा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्हाला गृहकर्ज (Home Loan)घ्या यचं असेल तर त्यासाठी लागणारी कर्ज पात्रता अत्यंत महत्त्वाची असते. अशा काही पद्धती आहेत त्याने आपण गृहकर्जासाठी लागणारी पात्रता वाढवू शकतो. जर कर्ज घेण्यास योग्य पात्रता नसेल तर यामध्ये सुधारणा करता येऊ शकते. याशिवाय इतर कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या केल्याने कर्ज मिळणे सोपं होऊ शकेल, याची माहिती आपण आता घेणार आहोत.

गृहकर्ज घेताना तुम्हाला मोठा कालावधी निवडावा लागणार आहे. जर तुम्ही सर्वाधिक कालावधीसाठी कर्ज घेतले तर तुम्हाला हफ्ताही कमी पडू शकतो. कोणतेही कर्ज घेताना त्याचा कालावधी अधिक असेल तर त्या कर्जासाठी द्यावा लागणारा हफ्ताही कमी असतो. जर हफ्ता कमी रकमेचा असेल तर ग्राहकाला तो वेळेत फेडता येऊ शकतो. त्यामुळे हफ्ता थकित होणे, असे प्रकरणं कमीच होतात. असे केल्यास बँकेलाही तुम्ही वेळेवर कर्जाचे हफ्ते फेडता हे समजू शकेल.

गृह कर्जाबाबत Certified Financial Planner यांनी सांगितले, की गृहकर्ज घेण्यासाठी तुमचे CIBIL चांगले असणे गरजेचे आहे. जर चांगला CIBIL स्कोर असल्यास तुम्हाला अगदी सहज कर्ज मिळू शकते.

750 च्या वरचा चांगला स्कोर
जर तुमचा CIBIL स्कोर 750 च्या वर असेल तर हा आकडा चांगला मानला जातो. एक चांगला CIBIL स्कोर असल्यास तुमच्या कर्जावरील व्याज कमी करू शकतो. तसेच गृहकर्जाची सर्वाधिक माहिती कर्जदारावर आधारित असते. जर आपल्याकडे इतरांचे देणे कमी असेल तर त्याचा फायदा तुम्हाला कर्ज घेताना होऊ शकतो.

उत्पन्नाचा दुसरा स्त्रोत असल्यास फायद्याचे
उत्पन्नाचा इतर स्त्रोत आय, अंशकालिक व्यवसाय यांची माहिती दिल्यास आर्थिक स्थिती सुधारवू शकते. याप्रकारे तुम्हाला उत्पन्नाचा दुसरा स्त्रोत जोडल्यास कर्जाची रक्कम जास्त मिळविण्यासाठी मदतीचे ठरू शकते. तसेच जर तुमच्या कुटुंबातील व्यक्ती नोकरी करत असेल आणि त्यांचा क्रेडिट स्कोर चांगला असेल तर तुम्ही जॉईंट होम लोनसाठी अप्लायही करू शकता.