Corona Virus : ‘या’ पध्दतीनं 30 सेकंदात नष्ट होईल ‘कोरोना’ व्हायरस, जाणून घ्या बचावाचे ‘उत्तम’ पर्याय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस (Coronavirus) कोविड १९ (Covid 19) ने आतापर्यंत संपूर्ण जगात ६०,१०८ लोक संक्रमित झाले आहेत. तसेच १३६३ लोक मृत्यू पावले आहेत. एकूण संक्रमित झालेल्या लोकांपैकी ५९,५३९ लोक फक्त चीनमधील आहेत. तर त्यापैकी १३६१ लोकांचा मृत्यू झालेला आहे. आता जर्मनीच्या शास्त्रज्ञांनी सांगितले आहे की कोरोना व्हायरसला कसे नष्ट करावे?

जर्मनीचे रुहर विद्यापीठ आणि ग्रीफ्सवॉल्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी कोरोना व्हायरसवर अभ्यास केला त्यात त्यांनी कोरोना व्हायरसवर आतापर्यंत करण्यात आलेल्या अभ्यासावर चिंतन केले. तेव्हा त्यांना कोरोना व्हायरस कसा नष्ट करता येईल हे समजले.

जर्मन शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार कोरोना व्हायरस नष्ट होण्याचा सर्वात महत्वाचा मार्ग म्हणजे स्वतःचे रक्षण करणे. जंतुनाशकांच्या मदतीने कोरोना व्हायरस नष्ट करता येतो.

या अभ्यासामध्ये असे सांगण्यात आले की कोरोना व्हायरसला ३० डिग्री सेल्सियस किंवा त्याहून अधिक तापमानात जिवंत राहणे कठीण जाते. जसजसे तापमान वाढत जाते तसे ते विषाणू निष्क्रिय होतात. म्हणजेच जेव्हा तापमान ३० अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक असेल तेव्हा कोरोनाची ताकद कमी होऊ लागते.

कोरोना व्हायरसला जंतुनाशकांच्या मदतीने नष्ट केले जाऊ शकते. अल्कोहोलने कोरोना व्हायरसचा एका मिनिटात नाश करता येऊ शकतो. तर, ब्लीचच्या मदतीने यास केवळ ३० सेकंदात नष्ट करता येते.

जर्मन वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, कोरोना व्हायरस उर्वरित फ्लू विषाणूपेक्षा चारपट जास्त काळ जिवंत राहतो. साधारण फ्लू विषाणू २-३ दिवस जिवंत राहतात. परंतु कोरोना व्हायरस त्यांच्यापेक्षा चार पट अधिक काळ जगू शकतो.

कोरोना व्हायरस फक्त सजीव नाही तर निर्जीव वस्तूवर सुद्धा जास्त वेळ जिवंत राहू शकतो. म्हणजेच लाकूड, काच, प्लास्टिक किंवा धातूपासून बनवलेल्या कोणत्याही वस्तूवर तो ९ दिवस जिवंत राहू शकतो. याचा अर्थ असा आहे की अशा गोष्टींपासून सावध असणे गरजेचे आहे.

जर्मन वैज्ञानिकांच्या अभ्यासामध्ये हा देखील खुलासा झाला की जर तापमान ४ अंश किंवा त्याहून कमी राहिल्यास कोरोना व्हायरस एका महिन्यापेक्षा जास्त काळ जिवंत राहू शकतो. जर निर्जीव वस्तू निर्जंतुकीकरणानेही स्वच्छ केल्या गेल्या तर संक्रमणाचा धोका कमी होतो.

कोरोना व्हायरस १५ सेकंदात निरोगी माणसाला संक्रमित करू शकतो. परंतु जर्मनीच्या शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार, अजून हे समोर आले नाही की कोरोना व्हायरस निर्जीव वस्तूंपासून माणसापर्यंत किती वेळात पसरतो.

जागतिक आरोग्य संघटनेने संपूर्ण जगाला सल्ला दिला आहे की कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी सतत अल्कोहोलने हात धुवा. मास्क लावणे देखील तितकेच गरजेचे आहे, खासकरून एन-९९ मास्क वापरा, कारण अलीकडेच चिनी शास्त्रज्ञांनी सांगितले होते की हा व्हायरस आता हवेत देखील पसरत आहे.