How To Protect And Secure Aadhar Card | तुमच्या आधार कार्डाचा गैरवापर होतोय ?; मग ‘या’ पद्धतीने करा सुरक्षित, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – How To Protect And Secure Aadhar Card | आधार (Aadhar Card) ही जगातली सर्वात मोठी बायोमेट्रिक व्यक्तिपरिचय योजना आहे. भारतीय रहिवाशांसाठी असलेल्या या योजनेचे नियंत्रण केंद्र सरकारच्या (Central Government) इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (Ministry of Electronics And Information Technology) आधिपत्त्याखालील युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) या प्राधिकरणामार्फत केले जाते. आधार कायदा 2016 अनुसार या योजनेला वैधानिक पाठबळ प्राप्त झालंय. दरम्यान, आधार कार्डविषयी अनेक गैरवापर (How To Protect And Secure Aadhar Card) होण्याचे प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. मग तुमचे आधार सुरक्षित कसे ठेवाल ? याबाबत जाणून घ्या.

 

आधार कार्ड युजर्सनं त्यांच्या आधार कार्डची फोटोकॉपी (Photocopy) कोणत्याही संस्थेला देऊ नये. तसेच, असं केल्यास तुमच्या आधार कार्डचा गैरवापर होऊ शकतो, असं UIDAI प्रसिद्धीपत्रकात सांगितलं होतं. आधार युजर्सचा डाटा पूर्णपणे सुरक्षित आहे आणि हा डाटा सुरक्षित राहण्यासाठी मजबूत व्यवस्था करण्यात आली आहे,” असा दावा `यूआयडीएआय`नं केला आहे. आधार युजर्सनं काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर कोणीही त्यांच्या आधार कार्डचा गैरवापर करू शकत नाही,`असा दावा करण्यात आला आहे. (How To Protect And Secure Aadhar Card)

 

1. टू फॅक्टर ऑथेंटिकेशन (Two Factor Authentication) –
आधार कार्डबाबत महत्वाची गोष्ट म्हणजे मोबाईल क्रमांक (Mobile Number) आणि ईमेलशी लिंक करणं होय. यामुळे गैरवापर होत नाही. लिंक केलं असल्यानं तुम्हाला कोणत्याही कामासाठी ओटीपी गरजेचे असते. त्यामुळे जो मोबाईल लिंक आहे त्यावर ओटीपी येतो. ओटीपी शिवाय आधारची पडताळणी करता येणार नाही. जर एखाद्या व्यक्तीने तुमच्या आधारचा गैरवापर करायचा प्रयत्न केला तरी ओटीपी नसल्यामुळे त्याचा हेतू यशस्वी होणार नाही. म्हणून आधारला मोबाईल लिंक करणे गरजेचे आहे.

2. मास्क्ड आधार प्रत (Masked Aadhaar Copy) –
समजा तुम्हाला कुठे आधार कार्डाची फोटोकॉपी देणं गरजेचे असेल तर अशावेळी मास्क्ड आधार कार्डची फोटोकॉपी द्यावी. मास्क्ड आधार कार्डमध्ये तुमच्या संपूर्ण आधार क्रमांकाऐवजी त्यातले केवळ शेवटचे ४ अंक दिसतात. या 2 अंकांच्या मदतीनं तुमची आधार पडताळणी होईल. त्याचबरोबर तुमचा संपूर्ण आधार क्रमांक दर्शवला न गेल्याने कोणीही त्याचा गैरवापर करू शकणार नाही. तुम्ही `यूआयडीएआय`च्या अधिकृत वेबसाईटवरून मास्क्ड आधार डाउनलोड करू शकणार आहात.

 

3. बायोमेट्रिक्स करा लॉक (Biometrics Lock) –
बायोमेट्रिक्स लॉक करून तुमचं आधार कार्ड सुरक्षित करू शकता. याची प्रक्रिया म्हणजे तुमचा अंगठा, बोटांचे ठसे आणि डोळ्यांतील बुबुळाचे स्कॅनिंग तुमच्या इच्छेविरुद्ध अथवा परवानगी शिवाय कोणीही वापरू शकणार नाही. तुम्ही `यूआयडीएआय`च्या वेबसाईटवर जाऊन तुमचे बायोमेट्रिक्स लॉक करू शकता. बायोमेट्रिक लॉक केल्यानंतर ओटीपी आधारित ऑथेंटिकेशन सुरूच राहते. तुम्ही बायोमेट्रिक्स तात्पुरते अथवा कायमस्वरूपी लॉक करू शकणार आहात.

 

4. व्हर्च्युअल आयडेंटिटीचा वापर व्हर्च्युअल आयडेंटिटी मध्ये (Virtual Identity) –

यात आधार क्रमांक लपवला जातो आणि तात्पुरता 16 अंकी व्हर्च्युअल आयडी तयार केला जातो.
यात युजर्सच्या आधार क्रमांकाचा उल्लेख नसला तरी त्याची ओळख प्रमाणित केली जातेय.
व्हीआयडी (VID) ही सुविधा मर्यादित काळापुरतीच वैध असते. नवीन व्हीआयडी तयार केल्यानंतर, जुना व्हीआयडी आपोआप संपुष्टात येतो.
आधार पोर्टलच्या माध्यमातून अथवा एम – आधारच्या मदतीने व्हर्च्युअल आयडेंटिटी तयार केली जाऊ शकते.
या पद्धतींनी तुम्ही तुमचे आधार कार्ड सुरक्षित ठेवू शकता.

 

Web Title :- How To Protect And Secure Aadhar Card | how to protect and secure your aadhar card from aadhar fraud

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा