PF पासून LPG सिलेंडर बुकिंगपर्यंत खुप कामाचे आहे Umang अ‍ॅप, जाणून घ्या कसे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उमंग अ‍ॅप खुप कामाचे अ‍ॅप आहे. या मोबाइल अ‍ॅपमध्ये तुम्हाला प्रॉव्हिडंट फंड (पीएफ), डिजिलॉकर, एनपीएस, एलपीजी सिलेंडरची बुकिंग, पॅन कार्ड, युटिलिटी बिल इत्यादीशी संबंधीत सेवा मिळतात. उमंग Umang अ‍ॅपद्वारे तुम्ही एकाच ठिकाणी 21499 प्रकारच्या सरकारी आणि युटिलिटी सेवांचा वापर करू शकता. उमंग Umang अ‍ॅप अँड्रॉईड, आयओएस आणि सर्व वेब ब्राउजर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे अ‍ॅप इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय तसेच राष्ट्रीय ई-गव्हर्नंन्स डिव्हिजनद्वारे विकसित करण्यात आले आहे.

असे डाऊनलोड करा उमंग अ‍ॅप
अँड्रॉईड फोन यूजर्स प्ले स्टोअर आणि आयफोनचे यूजर्स अ‍ॅप स्टोअरवरून हे अ‍ॅप डाऊनलोड करू शकतात. यूजर 9718397183 वर मिस्ड कॉल करून सुद्धा अ‍ॅपची लिंक मिळवू शकतात. याशिवाय, https://web.umang.gov.in सुद्धा अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी रिडायरेक्ट करते.

उमंग अ‍ॅपच्या मदतीने घरबसल्या करा कामे
उमंग अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर विविध सेवांचा लाभ घेण्यासाठी अनेक प्रकारची अ‍ॅप डाऊनलोड करण्याची आवश्यकता नाही.
या अ‍ॅपच्या मदतीने प्रॉव्हिडंट फंड (पीएफ),
डिजिलॉकर, एनपीएस, गॅस सिलेंडरची बुकिंग,
पॅन कार्ड, युटिलिटी बिल इत्यादीशी संबंधीत सेवा सहजपणे अ‍ॅक्सेस करता येऊ शकतात.

एलपीजी सिलेंडरची बुकिंग
उमंग अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही भारत गॅस, इण्डेन आणि एचपीसह सर्व कंपन्यांचे गॅस सिलेंडर बुक करू शकता.

पीएफ खातेधारकांसाठी उपयोगी
पीएफ अकाऊंट होल्डर्स आपल्या उमंग अ‍ॅपद्वारे पीएफशी संबंधीत 10 पेक्षा जास्त सेवा मिळवू शकतात. पीएफ बॅलन्स जाणून घेणे, 10 सी फॉर्म, पासबुक,
क्लेम रेज, ट्रॅक क्लेम, यूएएन अ‍ॅक्टिव्हेशन इत्यादी कामे करू शकतात.