WhatsApp वर ब्लॉक झाला असेल तर ‘नो-टेन्शन’; ‘या’ पध्दतीनं करता येईल मेसेज

मुंबई, ता. १: पोलीसनामा ऑनलाइन : सर्वांशीच बोलण्यासाठी WhatsApp चा वापर करावा लावतो मग ते मित्र असो वा नातेवाईक. पण बरयाचदा असं होतं की समोरची व्यक्ती रागात ब्लॉक करते. यामुळे त्या व्यक्तीपर्यंत आपले बोलणे पोहचत नाही व समस्या निर्माण होते. तुम्हालाही असं कोणी WhatsApp वर ब्लॉक केलं आहे का तर काळजी करू नको… . अश्या दोन सोप्या ट्रिक आहेत ज्याच्या मदतीने तुम्ही ब्लॉक झाल्यानंतर देखील समोरील व्यक्तीला मेसेज करू शकता.

या पद्धतीने ब्लॉक केलेल्या व्यक्तीशी बोलण्यासाठी तुम्हाला तिसऱ्या व्यक्तीची मदत घ्यावी लागेल. तुमच्या मित्राला सांगून एक WhatsApp ग्रुप बनवा. यात तुम्हाला व ज्या व्यक्तीने ब्लॉक केले आहे, त्याला अ‍ॅड करा. यानंतर तुमचा मित्र ग्रुपमधून लेफ्ट होऊ शकतो. आता तुम्ही थेट ग्रुपमध्ये मेसेज करू शकता. तुम्ही ग्रुपमध्ये जे मेसेज केले आहेत ते ब्लॉक केलेल्या व्यक्तीला दिसतील. या पद्धतीने तुम्ही तुमचे म्हणणे त्या व्यक्तीपर्यंत पोहचवू शकाल.

– या दुसऱ्या पद्धतीमध्ये तुम्हाला WhatsApp अकाउंट डिलीट करून पुन्हा Sign Up करावे लागेल. यानंतर तुम्हाला ब्लॉक केलेल्या व्यक्तीला थेट मेसेज करू शकता.
– सर्वात प्रथम WhatsApp मध्ये सेटिंग्स पर्यायावर जाऊन Account वर क्लिक करा.
– येथे ‘Delete My Account’ पर्यायावर क्लिक करा.
– येथे तुमचा देशाचा कोड (भारतासाठी +९१) आणि मोबाइल नंबर टाका.
– यानंतर ‘Delete My Account’ बटनवर क्लिक करून अकाउंट डिलीट करू शकता.
– अकाउंट डिलीट केल्यानंतर तुमचे अकाउंट पुन्हा नव्याने सुरू करा.
अशा पद्धतीने तुम्ही ब्लॉक ऑप्शनला बायपास कराल व ज्या व्यक्तीने ब्लॉक केले आहे, त्याला मेसेज करू शकता.

मात्र, ही पद्धत वापरताना लक्षात ठेवा की अकाउंट डिलीट केल्याने तुमचे सर्व चॅट देखील डिलीट होईल. तुम्ही पूर्ण बॅकअप गमावू शकता. त्यामुळे कोणती पद्धत वापरायची, हे तुम्ही ठरवू शकता.

Also Read This : 

 

SBI ची खास ऑफर, ‘कोरोना’ग्रस्तांना होणार 5 लाखांचा फायदा, ‘असा’ करा अप्लाय, जाणून घ्या

 

जाणून घ्या कोणत्या कारणामुळं हातांना आणि तळव्यांना जास्त घाम येतो, ‘हे’ उपाय आवश्य करा

 

मुंबई लोकल ट्रेन कधी सुरू होणार ?; महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या…

 

चेहर्‍यावर Wax केल्यानंतर चूकुन देखील ‘हे’ काम करू नका, स्किन होईल खराब; जाणून घ्या

 

बदलला BSNL चा हा प्लॅन, आजपासून रोज मिळेल 1GB च्या ऐवजी 2GB डेटा

 

Sugarcane Juice In Pregnancy : गरोदरपणात ऊसाचा रस पिण्यापूर्वी जाणून घ्या ‘या’ 5 गोष्टी, अन्यथा…